Tuesday, 5 March 2024

अहिराणी भाषेतील वाक्यप्रचार व म्हणी

आपल्या अहिराणी भाषेचा ह्रास होत चालला असून ती लोप पावेल ह्या उद्देशाने अहिराणी वसा जतन करण्याच्या हेतूने हे पेज तयार केले असून आपणास आनंदाने publish करीत आहे तरी आपणास माहीत असलेल्या काही म्हणी वाक्यप्रचार नक्कीच कमेंट्स बॉक्स मध्ये कमेंट्स करून सांगा👇

 अहिराणी भाषेतील वाक्यप्रचार व म्हणी

"दात कोरीसन पोट नही भरस."

"घोडा इकिसन डांगर खाऊ नई"

"नक्टी ना लगिनमा सतरा इगने"

"करणं येस, त्यामा रडनं येस"

आपणास माहीत असलेल्या काही म्हणी वाक्यप्रचार नक्कीच कमेंट्स बॉक्स मध्ये कमेंट्स करून सांगा👇

Friday, 16 June 2023

DROPBOX मध्ये असलेल्या विद्यार्थ्याला आपल्या शाळेत कसे परत घ्यावे

 DROPBOX मध्ये असलेल्या विद्यार्थ्याला आपल्या शाळेत कसे परत घ्यावे हे जाणून घेण्यासाठी खालील TEXT वर क्लिक करा.

Dropbox student return to school

Thursday, 13 April 2023

पॅन कार्ड आणि आधार लिंक

आयकर विभागाच्या म्हणण्यानुसार, पॅन कार्ड आणि आधार लिंक करण्यासाठी ३१ मार्चपर्यंतची मुदत देण्यात आली होती, मात्र आता सरकारने ही अंतिम तारीख ३० जूनपर्यंत वाढवली आहे. आयकर विभागाच्या माहितीनुसार, जर तुम्ही तुमचे पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक केले नाही तर तुमच्या पॅन कार्डशी संबंधित सर्व सेवा बंद होतील.

केंद्रीय वित्त मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, पॅन कार्ड आणि आधार लिंक करणे सर्वांसाठी अनिवार्य आहे परंतु विशिष्ट समुदायाच्या लोकांसाठी, पॅन कार्ड आणि आधार लिंक करणे विनामूल्य आहे, जसे की मेघालय, जम्मू आणि काश्मीरमध्ये राहणारे लोक आणि अंतर्गत आयकर कायदा 1961. अनिवासी आणि 80 वर्षांवरील व्यक्ती आणि जे भारताचे नागरिक नाहीत. या सर्वांसाठी पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करणे पूर्णपणे विनामूल्य आहे.

पण जर तुम्ही वर दिलेल्या यादीत आला नाही तर तुम्हाला पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करण्यासाठी 1,000 रुपये शुल्क भरावे लागेल.

पॅन कार्ड आणि आधार लिंक करण्याची प्रक्रिया खूप सोपी आणि मजेदार आहे, फक्त खालील लिंकवर टिचकी मारून पॅन आणि आधार नंबर टाका आणि लिंक करा.जर तुम्ही मेघालय, जम्मू आणि काश्मीरचे रहिवासी असाल किंवा पॅन आणि आधारमध्ये दिलेल्या माहितीनुसार अनिवासी असाल किंवा तुमचे वय 80 वर्षांहून अधिक असेल, तर ही प्रक्रिया तुमच्यासाठी विनामूल्य असेल आणि त्यांच्यासाठी ते आवश्यकही नाही. लोकांना पॅन आधार लिंक करण्यासाठी. खालील लिंकवर टिचकी मारा 

Link Adhhar with pan 

Friday, 23 December 2022

हळदीचा उपयोग

 *आरोग्य धनसंपदा*


  *हळदीच्या सेवनाने झपाट्याने कमी होईल खराब कोलेस्ट्रॉल?

----------------------------------------


      प्राचीन काळापासून हळदीचा वापर आरोग्यासाठी केला जातो. कोलेस्ट्रॉलच्या समस्येवरही हळद उपयुक्त ठरू शकते. फक्त वापरण्याची पद्धत एकदा जाणून घ्या

     हळद आपल्याला प्रत्येक घरामध्ये पाहायला मिळते. हळदीचा वापर सामान्यतः घरांमध्ये जेवण चवदार बनवण्यासाठी केला जातो. त्वचेचे सौंदर्य वाढवण्यापासून ते रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी हळद खूप फायदेशीर आहे. हळदीचा वापर प्राचीन काळापासून संसर्ग, जखम आणि पोटाच्या समस्यांसाठी केला जातो. हळद हा अनेक पोषक तत्वांनी समृद्ध आहे जी कर्करोग आणि मधुमेह यांसारख्या रोगांवर उपचार करण्यास मदत करते. हळदीचे आरोग्यदायी फायदे बाजारात सहज उपलब्ध आहेत आणि ती विविध प्रकारे वापरली जाऊ शकते. हळद रक्तातील कोलेस्टेरॉल नियंत्रित ठेवून हृदय निरोगी ठेवण्यास देखील मदत करू शकते. चला जाणून घेऊया हळदीचे सेवन कोलेस्टेरॉल नियंत्रित करण्यासाठी कसे उपयुक्त ठरते?


 *हृदयविकारात फायदेशीर*  शरीरात उच्च कोलेस्ट्रॉल म्हणजे तुम्हाला हृदयविकाराच्या झटक्यापासून स्ट्रोकपर्यंत कोणत्याही गोष्टीचा धोका असू शकतो. अशा परिस्थितीत हळदीसोबत कोलेस्टेरॉलची पातळी राखण्यासाठी वेळोवेळी अनेक अभ्यास आणि संशोधन केले गेले आहेत. प्राणी आणि मानवांवर केलेल्या संशोधनानुसार हळदीचे सेवन केल्याने रक्तातील कोलेस्टेरॉलच्या पातळीवर तीन प्रकारे परिणाम होतो.


 *1) LDL कोलेस्टेरॉलची पातळी कमी करणे...* 

लो-डेन्सिटी लिपोप्रोटीन म्हणजेच LDL कोलेस्टेरॉलला वाईट कोलेस्ट्रॉल म्हणतात आणि त्यामुळे हृदयाच्या गंभीर समस्या उद्भवू शकतात. हळदीचे सेवन केल्याने एलडीएल कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते आणि शरीरातील चांगल्या कोलेस्ट्रॉलची पातळी वाढते, ज्यामुळे आरोग्य सुधारण्यास मदत होते.


 *2) ऑक्सिडेशनपासून एलडीएल कोलेस्टेरॉलचे संरक्षण*

 एथेरोस्क्लेरोसिस तेव्हा होतो जेव्हा एलडीएल कोलेस्टेरॉल ऑक्सिजनसह प्रतिक्रिया देते, ज्यामुळे रक्ताभिसरणात अडथळा येऊ शकतो. हळदीचे सेवन केल्याने हे ऑक्सिडेशन थांबते, त्यामुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहते आणि रक्तवाहिन्याही निरोगी राहतात.


 *3) ट्रायग्लिसराइड पातळी कमी करणे* 

उच्च रक्तातील कोलेस्टेरॉलसह उच्च ट्रायग्लिसराइड पातळी हृदयाच्या आरोग्यास धोका निर्माण करू शकते. ट्रायग्लिसराइड देखील धमन्यांमध्ये तयार होते, ज्यामुळे LDL कोलेस्टेरॉल रक्ताभिसरण समस्या निर्माण करणे सोपे होते. हळदीच्या वापराने ट्रायग्लिसराइडचे प्रमाण नियंत्रित करता येते.


     हळदीमध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात. खराब कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रोज भाज्यांमध्ये हळदीचा वापर करावा. तसेच रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास दुधात चिमूटभर हळद टाकून प्यावे. याशिवाय रोज एक कप ग्रीन टी प्यायल्याने उच्च कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होण्यास मदत होते.


*(कॉपी पेस्ट)*


*निरोगी सुप्रभात.*

लिंबुच्या पानाचे फायदे

 *आरोग्य धनसंपदा*


*लिंबुच्या पानांचे आहेत एवढे विलक्षण फायदे की तुम्ही कधी विचार सुद्धा केला नसणार; पृथ्वीवर जणू हा रामबाणच.....!*


खरतर लिंबाच्या पानांचा आपण वर्षभर उपयोग करू शकतो व त्याचा फायदा घेऊ शकतो. आजच्या आमच्या या माहितीद्वारे आम्ही तुम्हाला या पानांचे खास फायदे सांगणार आहोत जे खूपच औषधी आहेत. हजारो वर्षांपासून याचा प्रयोग केला जात आहे. अनेक आजारांना याच्या मदतीने आपण दूर ठेवू शकतो. आयुर्वेदात याचे खूपच महत्व आहे. 


आज आपण लिंबाच्या पानांचे फायदे बघूया. तुमच्या जवळपास ही पाने मिळू शकतात. तुम्ही याचा प्रयोग करू शकतात. आयुर्वेदात माहिती महत्वाची आहे, योग्य प्रमाण खूप महत्वाचे आहे. तरच त्याचा फायदा मिळतो. याच्याबद्दल विस्ताराने जाणून घेऊ या. 


◼️महत्त्वाचे म्हणजे लिंबाचे पान जर हातात घेऊन ते चुरुन किंवा रगडून त्याचा वास घेतला, तर डोकेदुखीमध्ये आराम पडतो. कोणाला डोकेदुखी, अर्धशिशी, मायग्रेन असेल तर लिंबाच्या पानाचा प्रयोग करून तुम्ही ठीक होऊ शकता. याची पाने हातात रगडून ५ मिनिटे श्वास घ्या, तुम्हाला आराम मिळेल.


◼️ही पाने तुमच्या चेहर्‍यावरील डाग, खड्डे, मुरूमे दूर करण्यासाठी फायदेमंद आहेत. ही खूपच दिव्य अशी औषधी आहे. याची पाने घ्या, छोटी ५ ते ६ पाने घ्या, ती वाटून घ्या व त्यात मध मिसळून चेहर्‍यावर लावा. दिवसातून एकदा हा प्रयोग करून बघा, चेहर्‍यावरील सुरकुत्या, डाग, मुरूमे दूर होतील व चेहरा चमकदार होईल.


◼️लिंबाच्या पानांचे खूप फायदे आहेत.कोणाला त्वचारोग असेल, खाज, खरूज, नायटा, फोड असेल, तर ते दूर करण्यासाठी लिंबाची पाने खूपच उत्तम असे औषध आहे. त्या साठी एक साधा प्रयोग करून बघा. पाने वाटून त्याची पेस्ट बनवा, त्यात थोडा कापुर व कडुनिंबाचे तेल मिसळा. एक चिमुट हळद घाला. सगळे व्यवस्थित मिसळा व जिथे तुम्हाला खाज, खरूज, नायटा असेल त्याजागी ही पेस्ट लावा. कोणत्याही प्रकारच्या त्वचारोगात ह्याचा लेप खूपच फायदेशीर आहे. त्वचारोग नाहीसा होतो, खूपच दिव्य औषध आहे हे.


◼️केसांमधील कोंडा नाहीसा करण्यासाठी पण याचा उपयोग होतो. पाने वाटून पेस्ट बनवून केसांच्या मुळाशी लावून हलक्या हाताने मालीश करा. १ ते २ वेळा लावल्यामुळे केसातील कोंडा नाहीसा होतो.


पोटात जंत झाले असतील, साधारण लहान मुलांच्या बाबतीत जर पोटात जंत झाले, तर लिंबाच्या पानांचा ५ मिली रस घेऊन त्यात हलका मध घालून मुलाला पाजा, त्याच्या पोटातील जंत मरतील या रसाने. मोठ्या माणसासाठी १० मिली रस जरूरी आहे.


◼️कावीळ झाली असेल, तर त्यासाठी पानांचा १० मिली रस काढून तो ताकात मिसळून त्याचे सेवन करा. १० ते १२ दिवस हे घेतले तर कावीळ ठीक होते. हा काविळीसाठी रामबाण उपाय आहे.


◼️पोटातील कोणत्याही समस्येवर म्हणजेच गॅस, पोटदुखी, बद्धकोष्टता यावर हा उपाय प्रभावी आहे.


खरंतर सर्वांन माहीत आहे लिंबू खाण्याचे किती फायदे आहेत त्याचप्रमाणे याची पाने सुद्धा खूपच फायदेशीर आहेत. याच्या पानांचा काढा रक्त शुद्ध करतो. पाने घालून चहा बनवून घेऊ शकता.


*(काॅपीपेस्ट)*


*निरोगी सुप्रभात.*

Wednesday, 21 December 2022

लघवीच्या तपासणीने काय समजते ?

 *आरोग्य धनसंपदा*


  लघवीच्या तपासणीने काय समजते ?

तुम्ही डॉक्टरांकडे गेल्यानंतर डॉक्टर तुम्हाला तक्रारी विचारतात. तुमची तपासणी करतात. बऱ्याचदा तुम्हाला पॅथाॅलॉजी लॅबमध्ये जाऊन लघवीचे तपासणी करायला सांगतात. लघवीच्या तपासणीतून डॉक्टरांना काय समजते, ते आता समजावून घेऊ.

मूत्रपिंडामध्ये सतत रक्त गाळले जात असते. या प्रक्रियेत रक्तातील विषारी, टाकाऊ पदार्थ, अतिरिक्त पाणी आणि क्षार रक्तातून बाहेर काढले जातात. याचाच परिणाम म्हणून लघवी तयार होते. शरीरात चालणार्‍या चयापचयामुळे लघवीतील घटकही बदलत असतात. आता सामान्यपणे लघवीच्या ज्या तपासण्या केल्या जातात त्यामुळे काय समजते ते पाहू.

लघवीमध्ये सामान्यतः ग्लुकोज असायला नको. लघवीत जर ग्लूकोज असेल तर रुग्णाला मधुमेह असण्याची शक्यता असते. लघवीत अल्बुमिन हे प्रथीन जास्त प्रमाणात असले तर रुग्णाला मूत्रपिंडाचा विकार, गरोदरपणातील उच्च रक्तदाब इत्यादी रोग असण्याची शक्यता असते. 

लघवीत पित्ताचे क्षार किंवा बिलीरुबीन, युरोबिलीनोजेन आदी पदार्थ असतील तर कावीळ असण्याची शक्यता असते. लघवी मध्ये स्फटिक असतील तर अशा रुग्णांमध्ये क्षारांच्या चयापचयात दोष असू शकतो. लघवीत काही संप्रेरके आढळून आल्यास विशिष्ट रोगांचे निदान होऊ शकते. गरोदरपणाची खात्री अशाच प्रकारच्या एका तपासणीमुळे करता येते. 

लघवीत पू येत असेल तर मूत्रमार्गात काही जंतुसंसर्ग असू शकतो. लघवीत रक्त वा रक्तातील लाल रक्तपेशी येत असतील; तर मुतखडा, मुत्रपिंडाचा क्षयरोग किंवा मूत्रमार्गातील जखम यांसारखे रोग असू शकतात. लघवीमध्ये काही जंतू असले किंवा पू मधील पेशी असल्या, तर मूत्रमार्गाच्या जंतुसंसर्गाचे निदान होऊ शकते.

याखेरीज लघवीचे प्रमाण, लघवी करताना वेदना होणे, लघवी करताना जळजळ होणे, लघवी वारंवार होणे, लघवी न होणे; या सर्वांमुळेही काही रोगांचे निदान होऊ शकते. यावरुन तुमच्या लक्षात येईलच की, लघवी तपासल्याने अनेक गोष्टी कळु शकतात. त्यामुळे कंटाळा न करता लघवीची तपासणी करायला हवी.


डॉ. जगन्नाथ दीक्षित

डाॅ. अंजली दीक्षित

यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातून

मनोविकास प्रकाशन




Monday, 19 December 2022

जोतीराव गोविंदराव फुले

 जोतीराव गोविंदराव फुले


जोतिबा फुले यांचे मूळ गाव सातारा जिल्ह्यातील

कटगुण हे होते. त्याच गावी महात्मा फुल्यांचा

जन्म ११ एप्रिल १८२७ रोजी झाला. जोतिबांच्या

वडिलांचे नाव गोविंदराव आणि आईचे नाव चिमणाबाई होते.

वडिलांचा फुले विक्रीचा व्यवसाय होता. त्यामुळे

गोर्हे हे त्यांचे मूळ आडनाव असले तरी, पुढे ते फुले म्हणून ओळखले जाऊ लागले व तेच नाव पुढे रूढ

झाले. कटगुणहून त्यांचा परिवार पुरंदर

तालुक्यातील खानवडी येथे आला.तेथे त्यांचे घर असून, त्यांच्या नावे सातबाराचा उतारा आहे.

प्राथमिक शिक्षणानंतर काही काळ त्यांनी भाजी विक्रीचाव्यवसाय केला. १८४२ ला माध्यमिक

शिक्षणासाठी पुण्याच्या स्कॉटिश मिशन

हायस्कूलमध्ये त्यांनी प्रवेश घेतला.

बुद्धी अतिशय तल्लख त्यामुळे पाच-सहा

वर्षातच त्यांनी अभ्यासक्रम पूर्ण केला.सामाजिक कार्य

सप्टेंबर २३, इ.स. १८७३ रोजी महात्मा फुलेयांनी *सत्यशोधक समाजाची* स्थापना

केली. तथाकथित उच्चवर्णीयांकडून

होणार्या अन्यायापासून, अत्याचारापासून व

गुलामगिरीतून शूद्रातिशूद्र समाजाची

मुक्तता करणे व त्यांना हक्काचीजाणीव करून देणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय

होते.

 'सर्वसाक्षी जगत्पती ।

त्यालानकोच मध्यस्ती॥' 

हे या समाजाचे

घोषवाक्य होते. सत्यशोधक समाजाने

गुलामगिरीविरुद्ध आवाज उठविला आणि सामाजिकन्यायाची व सामाजिक पुनर्रचनेची

मागणी केली. 

समाजातील विषमता नष्ट करणे व

तळागाळातील समाजापर्यंत शिक्षण पोहचवणे हेसत्यशोधक समाजाचे ध्येय होते. महात्मा फुल्यांच्या

कवितेच्या शिक्षणाचे महत्त्व पटवून देणार्या

खालील ओळी प्रसिद्ध आहेत. -


“ विद्येविना मतीगेली।

 मतीविनानीतीगेली।

नीतीविनागती गेली।

गतीविना वित्त गेले।

वित्ताविना शूद्र खचले। इतके अनर्थ

एका अविद्येने केले।। ”


जोतीरावांनी त्यांच्या पत्नी

सावित्रीबाईंना शिक्षण देऊन शिक्षणकार्यास

प्रवृत्त केले. शाळेच्या मुख्याध्यापकपदी आरूढझालेली भारतातील पहिली

महिला म्हणजे सावित्रीबाई.त्याचप्रमाणे

स्वतंत्रपणे फक्त स्त्रियांसाठी शाळा काढणारेमहात्मा फुले पहिले भारतीय होत.

वाचनाची अतिशय आवड असल्यामुळे

शिवाजी महाराजांचे चरित्र व थॉमस पेन या

विचारवंताच्या ‘राईट्स ऑफ मॅन’ या ग्रंथाचा त्यांच्यावर विशेष

प्रभाव पडला. बहुजन समाजाचे अज्ञान, दारिद्र्यआणिसमाजातील जातिभेद पाहून ते अतिशय अस्वस्थ

होत असत. ही सामाजिक परिस्थिती

सुधारण्याचा त्यांनी निश्चय केला. त्याप्रमाणे

आपल्या पत्नी सावित्रीबाईंना १८४८

साली पुण्यामध्ये बुधवार पेठेतीलभिडे यांच्या वाड्यात पहिली

मुलींची शाळा काढून

तेथीलशिक्षिकेचीजबाबदारी सावित्रीबाईंवर

सोपविली. महाराष्ट्रातील

स्त्री शिक्षणाची ही

मुहूर्तमेढ ठरली. तसेच अस्पृश्यमुलांसाठी त्यांनी पुण्याच्या वेताळपेठेत

१८५२ मध्ये शाळा स्थापन केली. त्यांच्या याकार्यालासनातन्यांकडून सतत विरोध होत असे. पणजोतीराव आपल्या भूमिकेवर ठाम असत. समाज

सुधारण्याच्या कार्याला गती देण्यासाठी

व व्यापक करण्यासाठी १८७३ साली

त्यांनी ‘सत्यशोधक समाजा’ची

स्थापना केली. ‘कोणताही धर्म

ईश्वराने निर्माण केलेला नाही आणि चातुर्वण्य व

जातिभेद ही निर्मिती

मानवाचीच आहे’ असे रोखठोकपणे बोलताना मात्रया विश्वाची निर्मिती

करणारी कोणती तरी

शक्ती आहे अशी

त्यांचीविचारसरणी होती. मानवाने

गुण्यागोविंदाने रहावे असे त्यांचे मत होते. त्यांनीलिहिलेल्या ‘शेतकर्याचा असूड’ 

या पुस्तकातून

महाराष्ट्रातील शेतकर्यांची विदारक

दुर्दशा आणि दारिद्र्याची वास्तवता विशदकेली आहे. या पुस्तकाद्वारे विशाल दृष्टिकोनाचा

क्रांतिकारक म्हणून ही जोतीरावांचे

दर्शन होते.

 ‘नीती हाच

मानवी जीवनाचा आधार आहे’

 हाविचार मांडणारे जोतीराव एक तत्त्वचितक

व्यत्तिमत्त्व म्हणूनही आपल्यासमोर येतातसाहित्य आणि लेखन

' सार्वजनिक सत्यधर्म ' हा सत्यशोधक समाजाचा प्रमाण

ग्रंथ मानला जातो. या समाजाचे मुखपत्रम्हणून

' दीनबंधू' हे साप्ताहिक चालविले जात असे.

तुकारामाच्या अभंगांचा त्यांचा गाढा अभ्यास होता. अभंगांच्या

धर्तीवर त्यांनी अनेक 'अखंड'रचले. त्यांना सामाजिक विषमतेचे जागतिक भान होते. आपला'गुलामगिरी' ग्रंथ अमेरिकेतील

कृष्णवर्णीयांना त्यांनी समर्पित

केला. 'अस्पृश्यांची कैफियत' हा महात्मा फुलेंचाअप्रकाशित ग्रंथ आहे. सार्वजनिक सत्यधर्म हा त्यांचा

ग्रंथ त्यांच्या मृत्यूनंतर इ.स. १८९१ मध्ये प्रकाशितझाला.सन्माननीयउपाधी

जोतिबा फुले यांच्या सामाजिक कार्याची दखलघेऊन लोकांनी त्याना ‘महात्मा’ ही

उपाधी दिली. त्यामुळे ज्योतिबा फुले

हे महात्मा फुले या नावाने ओळखले जाऊ लागले.

इ.स. १८४८  भारतातील

मुलींची पहिली शाळा सुरूकेली. बहुजन समाजाच्या

शिक्षणासाठी काम सुरू केले.सप्टेंबर ७, इ.स. १८५१  भिडे वाड्यात व रास्ता पेठेत

मुलींच्या शाळेची सुरुवात.

इ.स. १८५२  पूना लायब्ररीची

स्थापना.

मार्च १५, इ.स. १८५२ वेताळपेठेत

अस्पृश्यांसाठी पहिली शाळा सुरू

केली.

नोहेंबर १६, इ.स. १८५२ - मेजर कॅन्डी

यांच्याकडून शैक्षणिक कार्यासाठी ब्रिटिश

सरकारतर्फे विश्रामबाग वाड्यातसत्कारकरण्यात आला.

२८ नोव्हेंबर, इ.स. १८९० - पुणे येथे निधन झाले.

विद्याध्यायानासाठी ज्यांचा सतत असे प्रयास,

त्यांचे अखंड जीवन म्हणजे, जणू एक खडतर

प्रवास.

परि स्त्री शिक्षण; हा एकची असे

ध्यास, हा एकची असे ध्यास,

या उक्तीप्रमाणे महात्मा ज्योतीराव

फुले यांनी आपले व्यक्तिमत्व स्वयंप्रेरणेने व

स्वतःच्या प्रयत्नांनी घडविले होते. त्यांचा पिंड हा

कृतीशील क्रांतिकारकाचा होता.

महाराष्ट्राच्या समाजसेवेसाठी ध्येयाने भरून

जाऊन आपले सर्व जीवन समर्पित करणारे ते

थोर पुरुष होते. आधुनिक भारतातले पहिले समाजक्रांतिकारक

म्हणून त्यांना ओळखले जाते. कारण ते

सामान्यांतील असले तरी विचाराने व

कर्तृत्वाने असामान्य होते. सामाजिक विषमतेविरुद्ध

ज्योतीबांनी बंड पुकारले. 'शिक्षण व

समता' या दोन शब्दातच त्यांच्या या कार्याचे यथोचित वर्णन

करता येईल. महाराष्ट्रातील सर्वसामान्यांसाठी रात्रंदिवस झटणारे ते सेवक होते.


संत गाडगे महाराज

संत गाडगे महाराज

              संत गाडगे महाराजांच पूर्ण नाव डेबूजी झिंगराजी जानोरकर होते. त्यांच्या वडिलांचे नाव - झिंगराजी राणोजी जाणोरकर तर आईचे नाव - सखुबाई झिंगराजी जणोरकर हे होते. गाडगे महाराज हे वैज्ञानिक दृष्टिकोन असलेले प्रसिद्ध समाजसुधारक होते. दीनदलित आणि पीडितांच्या सेवेमध्ये आपलं संपूर्ण आयुष्य व्यतीत करणारे गाडगेबाबा हे संता मधील सुधारक आणि सुधारकां मधील संत होते. त्यांच कीर्तन म्हणजे लोक प्रबोधनाचा एक भाग असे. आपल्या कीर्तनातून समाजातील दांभिकपणा रूढी परंपरा यावर ते टीका करत. समाजाला शिक्षणाचे महत्त्व पटवून देताना स्वच्छता आणि चारित्र्य याची शिकवण गाडगेबाबा देत. गाडगे महाराज यांचा जन्म  २३ फेब्रुवारी  १८७६ रोजी अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी तालुक्यातील शेणगाव या गावी झाला , त्यांचे नाव डेबुजी होते ,  ईश्वर कशात आहे ही नेमकी जाणीव असलेले संत आणि गोरगरीब, दीनदलित यांचा ऐहिक व आध्यात्मिक विकास होण्यासाठी; अज्ञान, अंधश्रद्धा, अस्वच्छता यांचे उच्चाटन करण्यासाठी तळमळीने कार्य करणारे होते.१८९२ साली त्यांचे लग्न झाले. त्यांच्या मुलीच्या बारश्याच्या दिवशी त्यांनी रूढीप्रमाणे दारु व मटणाच्या जेवणाऐवजी गोडाधोडाचे जेवण दिले होते. हा त्या काळातील परंपरेला दिलेला छेद होता. गावात कोणाचे काही अडले नडले, कोठेही काही काम करावयाचे असले की, गाडगे महाराज स्वतःहून पुढे येत. सार्वजनिक हिताची कामे ‘सर्व जनांनी’ एकवटून केली पाहिजेत हा धडा त्यांनी मिटल्या तोंडी गावकऱ्यांना शिकविला.दिनांक १ फेब्रुवारी, १९०५ रोजी त्यांनी घरादाराचा त्याग करून संन्यास स्वीकारला. त्यांनी तीर्थाटन केले, अनेक ठिकाणी भ्रमण केले. वनवासातही त्यांनी लोकसेवेचे व्रत सोडले नाही. कोठे कोणी अडचणीत सापडलेला असल्यास त्याला आपण होऊन मदत करायला धावायचे, मदत करून कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता आपल्या वाटेने निघून जायचे हा त्यांचा खाक्या असायचा. ते सतत एक खराटा जवळ बाळगायचे. अंगावर गोधडीवजा फाटके-तुटके कपडे आणि हातात एक फुटके गाडगे असा त्यांचा वेष असे. त्यामुळेच लोक त्यांना ‘गाडगेबाबा’ म्हणू लागले. ते ज्या गावात जात तो गाव झाडून स्वच्छ करीत. सार्वजनिक स्वच्छता,अंधश्रद्धा निर्मूलन ही तत्त्वे समाजात रुजविण्यासाठी त्यांनी स्वतः सातत्याने सक्रिय राहून जिवापाड प्रयत्न केले.समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा, भोळ्या समजुती, अनिष्ट रूढी-परंपरा दूर करण्यासाठी त्यांनी आपले पूर्ण आयुष्य वेचले. यासाठी त्यांनी कीर्तनाच्या मार्गाचा अवलंब केला. आपल्या कीर्तनात ते श्रोत्यांनाच विविध प्रश्न विचारून त्यांना त्यांच्या अज्ञानाची, दुर्गुण व दोषांची जाणीव करून देत असत. त्यांचे उपदेशही साधे, सोपे असत. चोरी करू नका, सावकाराकडून कर्ज काढू नका, व्यसनांच्या आहारी जाऊ नका, देवा-धर्माच्या नावाखाली प्राण्यांची हत्या करू नका, जातिभेद व अस्पृश्यता पाळू नका असे ते आपल्या कीर्तनातून सांगत. देव दगडात नसून तो माणसांत आहे हे त्यांनी सर्वसामान्यांच्या मनावर ठसविण्याचा प्रयत्न केला. ‘देवभोळ्या माणसापासून ते शहरी नास्तिकापर्यंत,कोणत्याही वयोगटातील लोकांना गाडगेबाबा आपल्या कीर्तनात सहजपणे गुंतवून ठेवत, आपले तत्त्वज्ञान पटवून देत. त्यांच्या कीर्तनाचे शब्दचित्र उभे करणे माझ्या ताकदीबाहेरचे काम आहे .’ असे उद्‌गार बाबांचे चरित्रकार प्रबोधनकार ठाकरे यांनी काढले होते.त्यांनी कुष्ठरोग्यांची सेवा केली.देव, देव करत लोकांचे प्रश्न सुटणार नाहीत, कर्मकांड लोकांना अधोगतीकडे नेते हे जाणलेल्या गाडगेबाबांनी विज्ञानवादी दृष्टिकोनाचा प्रसार आणि प्रचार करायला सुरुवात केली. समाजाची प्रगती ही स्वच्छतेतून होईल, शिक्षणातून होईल. हरी हरी करून कोणतेही प्रश्न सुटणार नाहीत. त्यासाठी लोकांना प्रयत्नवादी व्हावे लागेल, हे त्यांनी जाणले. ते फक्त विचार मांडणारे कीर्तनकार नव्हते तर प्रत्यक्ष विचार आचरणात आणून नंतरच त्यावर भाष्य करणारे होते. खेड्यापाड्यातील गल्लोगल्ली स्वत: खराटा फिरवणारे होते. स्वच्छतेच्या मोहिमेचा उपयोग जातीजातीतील भेदभाव नष्ट करण्यासाठीही त्यांनी केला. स्वच्छतेचे महत्त्व त्यांनी विदर्भापासून खानदेशापर्यंत, पश्चिम महाराष्ट्रापासून मुंबई, कोकणापर्यंत कीर्तनाच्या माध्यमातून पोहोचवले. शिक्षण, सावकारी, देवस-नवस, पशुहत्या यांसारखे विषय घेऊन मायबोलीत कीर्तनाद्वारे समाज प्रबोधन केले.अंधश्रद्धेवर, मूर्तिपूजेवर गाडगेबाबा बोच-या शब्दांत मार्मिकपणे हल्ला चढवायचे ‘अरे तुमी पंढरीले जाता, शेगावले जाता; पण त्यो तुमचा म्हणतात, ‘असा कसा तुमचा देव? कुत्रं निवद खाते तर त्याला हाडबी नाही मनत.’ हे ऐकून काही लोकांना हसू यायचे, तर देव मानणा-यांना राग यायचा. पण कीर्तनाला बाया, मुले, माणसे गर्दी करायचे.  मा. म. देशमुख गाडगेबाबांबद्दल लिहितात, ‘गाडगेबाबांनी भारतीय समाजाचे मन स्वच्छ केले.’
ज्या गावात संत गाडगेबाबांचे कीर्तन असायचे त्या गावात दवंडी देऊन ग्रामस्थांना माहिती दिली जायची. त्या गावात जाऊन दिवसभर गल्ल्या स्वच्छ करून संध्याकाळी त्याच गावात कीर्तन करत असत. कीर्तनात टाळ, मृदंग, खंजिरी असायची. एक उदाहरण संपले की, ‘गोपाला, गोपाला देवकीनंदन गोपाला..’या धृवपदाचा कीर्तनात गाभा असायचा. बाबा हे धृवपद हात उंच करून टाळ्या वाजवत तालात म्हणत, तसेच कीर्तन ऐकणा-यांना त्याच तालावर म्हणायला सांगायचे. मग दुसरा विषय घेऊन पुन्हा कीर्तनाला सुरुवात होई. ते ग्रामस्थांच्या, समाजातील अंधश्रद्धेवर टीका करून मवाळ भाषेत कथाकथन करून श्रोते आपलेसे करायचे. त्यांची भाषा गावाकडची. व-हाडी भाषा. त्यामुळे मले, तुले, बावा, लेकरू, पोरगं असे शब्द ते कीर्तनात वापरत असत. त्यातला मर्म समजला की, लोक पोट धरून धरून हसून दाद द्यायचे.  देव दगडात नसून तो माणसांत आहे हे त्यांनी सर्वसामान्यांच्या मनावर ठसविण्याचा प्रयत्न केला. ते संत तुकाराम महाराजांना आपले गुरू मानीत. ‘मी कोणाचा गुरू नाही, मला कोणी शिष्य नाही’ असे ते कायम म्हणत.. गाडगेबाबांनी संत तुकारामांच्या नेमक्या अभंगांचा मुबलक वापरही वेळोवेळी केला. ‘देवभोळ्या माणसापासून ते नास्तिकापर्यंत,कोणत्याही वयोगटातील लोकांना गाडगेबाबा आपल्या कीर्तनात सहजपणे गुंतवून ठेवत, आपले तत्त्वज्ञान पटवून देत. त्यांच्या कीर्तनाचे शब्दचित्र उभे करणे माझ्या ताकदीबाहेरचे काम आहे .’ असे उद्‌गार बाबांचे चरित्रकार प्रबोधनकार ठाकरे यांनी काढले होते. असा हा स्वच्छतेचा पुजारी आधुनिक समाज सुधारक. आज इथे उद्या तिथे. अंगावर फाटक्या चिंध्यांचे कपडे व पाणी पिण्यासाठी गाडगे घेऊन, आज एका गावाला तर उद्या दुस-या गावाला, ना अन्नाची, ना जेवणाची, ना झोपण्याची फिकीर. जे मिळेल ते खायचे. जेथे जागा मिळाली तेथे झोपायचे. त्यांना फक्त एकच ध्यास होता तो कीर्तनातून लोकजागृती करायची. त्यापायी त्यांनी उभ्या संसाराकडे पाठ फिरवली. त्यांनी कीर्तनातून समाज प्रबोधनाचे महान कार्य केले. हे कार्य ते आजीवन करीत राहिले.संत गाडगेबाबा यांनी लोकशिक्षणाचे कार्य विदर्भातील ऋणमोचन या गावापासून सुरू केले. १९०८मध्ये पूर्णा नदीवरील घाट सर्वधर्मीयांसाठी, जातीसाठी खुला केला. १९२५ला मूर्तिजापूर येथे गोरक्षण धर्मशाळा व विद्यालय स्थापन केले. १९२७ला पंढरपूर येथे चोखामेळा धर्मशाळा सुरू केली.त्यांनी शिक्षणाचे महत्त्व जाणले म्हणून आठ फेब्रुवारी १९५२ रोजी श्रीगाडगेबाबा मिशन स्थापन केले. बाबांनी  डॉ. पंजाबराव देशमुख यांना शिक्षणसंस्थांद्वारे शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी त्यांच्या कार्यात मदत केली. त्याद्वारे त्यांनी महाराष्ट्रभर शिक्षणसंस्था व अनाथ, अपंग यांच्या पुनर्वसनासाठी त्र्यंबकेश्वर, आळंदी, पंढरपूर इत्यादी ठिकाणी धर्मशाळा स्थापन केल्या.आचार्य अत्रे गाडगेबाबांबद्दल एका ठिकाणी म्हणतात, ‘सिंहाला पाहावे वनात, हत्तीला पाहावे रानात तर गाडगेबाबांना पाहावे कीर्तनात.’ १९३१ला वरवंडे येथे संत गाडगेबाबांच्या प्रबोधनाने पशुहत्या बंद झाली. १९५४ मध्ये जे. जे. रुग्णालय परिसरात त्यांनी धर्मशाळा बांधली. भारतरत्न डॉ. बाबासाहेबांची संत गाडगेबाबांशी मुंबईला तसेच पंढरपूरला भेट झाली. पंढरपूरची चोखामेळा धर्मशाळा संत गाडगेबाबांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अर्पण केली होती. या आधुनिक विज्ञानवादी संताचा डॉ. आंबेडकर आदर करीत. त्यांना ते गुरुसमान मानीत.. एकदा मुंबईच्या भायखळा मार्केटमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर  यांचे भाषण सुरु होते ,अचानक गाडगे बाबांना पाहून बाबासाहेब देखील अचंबित झाले. वर केलेल्या दोन्ही हातात हार घेउन स्टेजसमोर उभ्या असलेल्या गाडगे महाराजांना बाबासाहेब म्हणाले." बाबा तुम्ही खाली का उभे..? वर या ना..". " नाही बाबासाहेब तुम्हीच खाली या आणि या अडाण्या चाहार घ्या.. वेळ होत होता म्हणून बाबासाहेब जरा रागातच म्हणाले.बाबा तुम्ही, स्टेजवर का येत नाही..?त्यावर ते संतशिरोमणी गाडगे महाराज शांतपणे स्नेहाद्र आवाजात बोलले..बाबासाहेब..तुम्ही ज्या स्टेजवर उभे आहात, त्या स्टेजला पाय लावायची माझी तरी लायकी नाही.गाडगेबाबांच्या तोंडून असे बोल बाहेर पडताक्षणीच बाबासाहेब मंचावरून खाली उतरले. त्या महान संतांची पुष्पमाला स्वीकारली आणि दोघांनी एकमेकांना प्रेमाने कडकडून मिठी मारली. " आता तुमचे चालू द्या.असे बोलून क्षणांत गाडगे महाराज निघून गेले. त्या धर्माचा दहा कलमी कार्यक्रम समाजापुढे ठेवला. 
भुकेल्यांना अन्न, लहान लेकरांना अन्न, वस्ती नसणा-यांना वस्ती, गरीब विद्यार्थ्यांना शिक्षण, घर नसणा-यांना घराचा निवारा, आसरा, काम नसणा-यांना कामधंदा, रोजगार, अंध, अपंग, रुग्णांना औषधे, मुक्या प्राण्यांना अभय, गरीब तरुण-तरुणींचे लग्न जमवून देणे, दु:खी, निराश असणा-यांना हिंमत देऊन जगण्याचे बळ देणे इत्यादी त्यांचे विचार आजही सामाजिक न्यायाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत.
महाराष्ट्रातील संतपरंपरेबाबत ‘ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस’ असे म्हटले जाते. संत गाडगेबाबांच्या कार्यामुळे - ‘या भागवत धर्माच्या कळसावर गाडगेबाबांनी २० व्या शतकात कर्मयोगाची ध्वजा चढवली’ - असे म्हटले जाते. ‘महाराष्ट्रातील समाजवादाचे प्रचंड व्यासपीठ’, असे यथार्थ उद्गार आचार्य अत्रे यांनी संत गाडगेबाबांबद्दल काढले आहेत. त्यांनी रोकडा धर्म सांगितला. त्यांनी कीर्तनातून विज्ञानवादी लोकजागृती, लोकप्रबोधनाचे कार्य अखेरच्या श्वासापर्यंत केले. ‘गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला’ या भजनाचा प्रसार करणाऱ्या,कर्मयोगावर दृढ श्रद्धा असणाऱ्या या सत्पुरुषाची आणि कर्त्या समाजसुधारकाची समाधी अमरावती येथे आहे.अमरावती विद्यापीठाला गाडगे बाबांचे नाव देवून संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ असे नामकरण करण्यात आलेले आहे.

Sunday, 20 November 2022

21दिव्यांग प्रकार

                        21 दिव्यांग प्रकार 

आपल्या शाळेत समावेशीत शिक्षण हा शिक्षण प्रकार अवलंब केला असून त्या अनुषंगाने सर्व प्रकारची विद्यार्थी शाळेत शिक्षण घेत असतात.काही विद्यार्थी हे दिव्यांग असतात.परंतु आपल्या लक्षात येत नाहीत.त्यामुळे त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे कठीण होते.त्यासाठीच आपणासाठी 21 दिव्यांगाचे प्रकार आणि त्यांची लक्षणे यासाठी PDF download करणेसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://drive.google.com/file/d/1bO19ux63B3S0fA33deS2qy214YfvNwTg/view?usp=drivesdk

21 दिव्यांग प्रकार व लक्षणे



Monday, 14 November 2022

एक किलो लोणी

 *एक किलो लोणी.....बोधकथा*


एक शेतकरी आपल्या गावामधून शहराच्या बाजारात लोणी विकण्यासाठी जायचा. एका दुकानदाराला त्याचे लोणी खूप आवडले. दुकानदाराने शेतकऱ्याला दररोज एक किलो लोणी घेऊन ये असे सांगितले. शेतकरीसुद्धा हे ऐकून खुश झाला.शेतकऱ्याने त्याच दुकानातून एक किलो साखर आणि इतर वस्तूंची खरेदी केली. सामान घेऊन तो घरी आला. दुसऱ्या दिवसापासून शेतकरी दररोज दुकानावर एक किलो लोणी देऊ लागला. दुकानदारही दररोज शेतकऱ्याला लोण्याचे पैसे देत होता. काही दिवस असेच चालू राहिले.


एका दिवशी दुकानदाराने शेतकऱ्याने दिलेल्या लोण्याचे वजन केले, तर ते ९०० ग्रॅमच भरले. दुकानदाराला खूप राग आला. पैसे एक किलोचे घेतो. आणि लोणी ९०० ग्रॅमच देतो, हे दुकानदाराला अजिबात आवडले नाही. शेतकरी फसवणूक करत आहे, असा विचार त्याच्या मनात आला.


दुसऱ्या दिवशी शेतकरी लोणी घेऊन दुकानात आल्यानंतर दुकानदाराने त्याच्या समोरच लोण्याचे वजन केले तर ते ९०० ग्रॅमच भरले. आता मात्र दुकानदाराच्या क्रोधाचा पारा अधिकच वाढला. तो शेतकऱ्यावर ओरडून म्हणाला, तू मला धोका देत आहेस.


शेतकरी म्हणाला, अहो भाऊ माझ्याकडे वजन करण्यासाठी एक किलोचे मापच नाही, तुमच्याकडून जी एक किलो साखर खरेदी केली होती त्याचे माप बनवूनच मी लोणी मोजून आणतो. शेतकऱ्याचे हे उत्तर ऐकून दुकानदाराची मान शरमेने खाली गेली. कारण तो स्वतःच चुकीचे काम करत होता.

त्याच्या लक्षात आले की,

आपण जसे कर्म करतो, तसेच फळ आपल्याला मिळते.


या छोट्याच्या कथेची शिकवण अशी आहे की, आपण चुकीचे काम केल्यास, आपल्याला त्याचे फळही तसेच मिळते. कारण शेवटी जैसी करनी, वैसी भरनी. मी जगाला देईन, तसे जग मला देईल, ही भावना प्रत्येकाच्या मनात सतत असावी.


सुगंध देणारी अगरबत्ती संपली की मागे फक्त राख उरते,त्या राखेला परत कधीच सुगंध येत नाही, तसंच मनुष्य देहात जोपर्यंत जीव आहे, तोपर्यंत छान जगा.

कारण जीवन खूप सुंदर आहे, त्याला आणखी सुंदर बनवा.


भूक लागली म्हणून, भाकरीऐवजी 'पैसा' खाता येत नाही आणि 'पैसा' जास्त आहे म्हणून भुकेपेक्षा जास्त "अन्न" खाता येत नाही

म्हणजेच जीवनात 'पैशाला' ठराविक रेषेपर्यंतच स्थान आहे.


पैशाच्या राशीत झोपणाऱ्या माणसांपेक्षा, आयुष्यभर प्रामाणिक राहून कमाविलेली सोन्यासारखी माणसं हीच  श्रीमंती आहे.

अत्तर सुगंधी व्हायला, फ़ुले सुगंधी असावी लागतात


नाती सुंदर होण्यासाठी, माणसाचे स्वभाव निर्मळ असावे लागतात.


दुसऱ्याकडून चांगलेपणाची अपेक्षा ठेवताना, आपणही किती चांगले आहोत हेही तपासून पहाणे आवश्यक असते


"कर्म तसे फळ"हा भगवान श्रीकृष्ण यांनी सांगितलेला जीवन सिद्धांत लक्षात घेऊन आचरण केले, तरच आपले आणि इतरांचे जीवन नक्कीच सुखी होईल.


*श्री कृष्णम वंदे 🙏🏻*


 *सुनील इनामदार.*

Thursday, 15 September 2022

प्रत्येक महिन्यांची Salary Slip आता ऑनलाईन पाहता येणार

  *प्रत्येक महिन्यांची Salary Slip आता ऑनलाईन पाहता येणार*

Touch below link
shalarth.maharashtra.gov.in/login.jsp


आपण आपली प्रत्येक महिन्याची सॅलरी स्लिप स्वतः डाउनलोड करू शकता.
यासाठी आपणास आवश्यक असणारी माहिती म्हणजे फक्त तुमचा *शालार्थ ID.*(पगार बिलावर तुमच्या नावाच्या खाली असणारा 13 अंकी ID)
यासाठी खालीलप्रमाणे Password बनवा
1) https://shalarth.maharashtra.gov.in/login.jsp या वेबसाईटला जा.
2) लॉग इन पेजवर जाऊन Username म्हणून तुमचा *शालार्थ ID* टाका.
तुमचा Default पासवर्ड ifms123 हा आहे.
3) लॉग इन केल्यानंतर Old password ifms123 हा टाका.
New password बनवा
(त्यात Capital letter, Small letter, Character,Digit यांचा समावेश असावा).
तुम्हाला हवा तो पासवर्ड ठेवून पासवर्ड reset करा व नवीन पासवर्डने पुन्हा लॉग इन करा.
4) लॉग इन झाल्यानंतर तिथे एकच टॅब आहे. Employee Corner जाऊन Pay slip निवडा.
5) 2019 नंतरच्या तुम्हाला हव्या त्या महिन्याची Pay slip निवडा डाउनलोड करा व Print करा.

रेशनकार्डमध्ये मुलाचे नाव जोडण्यासाठी

 आधार कार्ड सारखेच एक कार्ड म्हणजे रेशनकार्ड कोणत्याही सरकारी कामासाठी रेशनकार्ड मागितले जातेच. शिवाय, सरकारच्या विविध योजनांचा लाभही रेशनकार्ड धारकांना होतो. त्यामुळे प्रत्येकाकडे रेशनकार्ड असणे गरजेचे आहे. रेशनकार्ड मुळे स्वस्त धान्य मिळते, तसेच गॅस जोडणी घ्यायची असो, जात प्रमाणपत्र काढायचे असो वा अन्य दाखले…

रेशनकार्ड मागितले जातेच. अशा वेळी रेशनकार्डमध्ये मुलाचे नाव नसल्यास तुमच्या कामात अडथळा येतो. रेशनकार्डमध्ये मुलाचे नाव तुम्ही सहज जोडू शकता. यासाठी सरकारने ऑनलाईन व ऑफलाईन दोन्ही सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. आपल्या घरातील मुलाचे नाव रेशनकार्डमध्ये कसे जोडायचे, याबाबत सविस्तर जाणून घेऊ या.

आवश्यक कागदपत्रे:- रेशनकार्डमध्ये मुलाचे नाव जोडण्यासाठी मुलाचे जन्म प्रमाणपत्र, सोबत घरातील प्रमुखांचे रेशनकार्ड (फोटोकॉपी आणि मूळ
दोन्ही), दोन्ही पालकांचे आधार कार्ड आवश्यक असेल.
अर्ज करण्याची पद्धत:- सर्वप्रथम अन्नपुरवत्याच्या https://rcms.mahafood.gov.in/ वेबसाईटवर जा. वेबसाईटवर तुम्हाला लॉगिन आयडी बनवावा लागेल. आधीपासूनच लॉगिन आयडी असेल, तर त्याद्वारे लॉग इन करा. होम पेजवर नवीन सदस्य जोडण्याच्या पर्यायावर क्लिक करा. तुमच्यासमोर नवीन फॉर्म येईल. त्यावर कुटुंबातील नवीन सदस्यांची सर्व माहिती योग्य
पद्धतीने भरून फॉर्मसोबत आवश्यक कागदपत्रे अपलोड करा. फॉर्म सबमिट केल्यानंतर नोंदणी क्रमांक दिला जाईल. त्याद्वारे तुम्ही या पोर्टलवर तुमचा स्थिती चेक करू शकता. अशाप्रकारे तुम्ही तुमच्या मुलाचे नाव रेशनकार्डमध्ये जोडू शकता.

Friday, 26 August 2022

कर्मचाऱ्याचा एकूण पगार हा बेसीक, महागाई, घरभाडे , प्रवास भत्ता मिळून बनतो, घरभाडे हा पगाराचाच भाग आहे

 *कर्मचाऱ्याचा एकूण पगार हा बेसीक, महागाई, घरभाडे , प्रवास भत्ता मिळून बनतो, घरभाडे हा पगाराचाच भाग आहे.*  -------------- 

   शिक्षक हा देश घडवणारा व देश चालवणारा आहे.याचे कारण वेळोवेळी शासनाला आवश्यक  असलेली माहिती कोणत्याही खात्याशी सबंधित असो शिक्षकच देवू शकतो आणि देत आलेला आहे, यादृष्टीने देश चालवणारा हा प्राथमिक शिक्षकच आहे.अशा या शिक्षकाला विशषतः प्राथमिक शिक्षकावर आपण मुख्यालयी राहतो असे खोटं सांगून घरभाडे घेतात असा आपण आरोप लावला परंतु आपल्या माहितीसाठी सांगतो की घरभाडे हा पगाराचाच भाग आहे याचा मुख्यालयी राहण्याचा सबंध येत नाही,जर मुख्यालयी शासनाने क्वार्टर बांधुन दिले असेल तरच घरभाड देता येत नाही. जसा महागाई प्रवास भत्ता तसेच घरभाडे ... हे सर्व मिळून साठ ते सत्तर हजार पगार  बणत असतो,सरासरी त्यापेक्षाही कमी आहे. आणि हो शिक्षकाचा पगार घरभाड काढता तो सुद्धा तुम्हचं बोट धरुन अक्षर गिरवून तुम्हाला विधानसभेपर्यंत पोहचता आलं ती कोण्यातरी शिक्षकाचीच पुण्याई आहे. त्यांचासुद्धा हा अपमान आहे. बरं असो बेसीक महागाई घरभाडे सर्वकाही पकडून शिक्षकाचा सद्यस्थितीत सरासरी पगार ६० ते ७० हजार आहे.या पगाराचा हिशोब आपल्यापुढे सादर करीत आहो.

*शिक्षकांना करावी लागणारी शालाबाह्य कामे*

    प्राथमिक शिक्षकाला चपरासी,बाबू,शिक्षक,मुख्याध्यापक ही चारही कामे स्वतः एकट्यालाच पार पाडावी लागते त्या कामाची माहीती.

१,- शाळा उघडणे

२,- वर्गखोल्या,परीसर,मुतार्या,संडास स्वच्छ करणे.

३,- घंटी वाजवणे.

४,- पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे.

५,- वर्गखोल्यांची रंगरंगोटी सजावट करणे.

६,- डिजिटल वर्गखोल्या तयार करणे.

   * *निवडणूका*

७, - ग्रामपंचायतची निवडणूक पार पाडणे .

८, - पंचायत समितीची निवडणूक पार पाडणे

९, - जिल्हा परिषदची निवडणूक पार पाडणे .

१०,- विधानसभेची निवडणूक पार पडणे.

११, -लोकसभेची निवडणूक पार पाडणे .

१२, - मतदार याद्या तयार करण्याचे BLO म्हणून काम पार पाडणे.

   * *बांधकामे*

१३,- ईमारत बांधकाम

१४,- संडास मुतार्या बांधकाम

१५,- हँडवाश स्टेशन बांधकाम

१६,- इमारत देखभाल दुरुस्ती

    * *सर्वेक्षणे*

१७,- शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण करुन त्यांना शाळेत दाखल करुन शाळेच्या प्रवाहात आणने.

१८,- संपूर्ण गावाचे वयोगटानुरुप संवर्गारुप साक्षर निरक्षर सह दाखलपात्र विद्यार्थी सर्वेक्षण.

१९,- जनगणना सर्वेक्षण.

२०,- दारिद्रय रेषेखालील लोकांचे सर्वेक्षण.

२१, - पशुसर्वेक्षण

२२, - शौच्छालयाचे सर्वेक्षण

 * *शालेय समित्या स्थापण करणे*

२३, - शालेय व्यवस्थापण समिती स्थापण करण्यासाठी संपूर्ण निवडप्रक्रीया पार पाडणे.

२४,- शा.व्य.स.च्या मासिक सभा व त्याचे इतिवृत्त कार्यवाही रजिस्टर मेंटन करणे.

 २५,- पालक समिति निवड करणे,दरमहा सभा घेणे व त्याचे इतिवृत्त कार्यवाही रजिस्टर मेंटन करणे.

 २६,- मातापालक समिती निवड करणे.दरमहा सभा घेणे,त्याचे इतिवृत्त कार्यवाही रजि.मेंटन करणे .

२७,- शालेय पोषण आहार समिती निवड करणे,दरमहा सभा घेणे, इतिवृत्त कार्यवाही रजि.मेंटन करणे.

२८, - विद्यार्थीनी सुरक्षा समिती तयार करणे,सभा घेणे इतिवृत्त कार्यवाही रजिस्टर मेंटन करणे.

 २९,- तंबाखू व्यसनमुक्त समिती तयार करणे मासिक सभा घेणे इतिवृत्त कार्यवाही रजि.मेंटन करणे.

३०,- तंबाखू मुक्त शाळा घोषीत करणे.

३१, - विद्यार्थी परिवहन समिती तयार करणे मासीक सभा घेणे इतिवृत्त कार्यवाही रजि.मेंटन करणे.

३२,- गावातील तंटामुक्त व इतर समित्यांवर पदसिद्ध सदस्य म्हणून मु.अ.ना भुमिका पार पाडावी लागते.

३३,- ग्रामसेवकाच्या अनुपस्थीतीत ग्रामसभेचा सचिव म्हणून मु.अ.ना भुमिका निभवावी लागते.

* *विविध शालेय योजनांची अंमलबजावणी करणे*

३४,- शालेय पोषण आहार योजने अंतर्गत स्वयंपाकीची व मदतनीसाची निवड करणे.

३५, - स्वयंपाकीची व मदतनीसाची करारनामे,बॕकखाते,आधार,मेडिकल सर्टिफिकेट इ.दस्तावेज फाईल तयार करुन कार्यालयाला सादर करणे, माहिती अॉनलाईन करणे.

 ३६,- रोजच्या उपस्थितीनुसार शालेय पोषण आहार लाभार्थांची रोजची रोज माहिती आनलाईन करणे.

३७, - शालेय पोषण आहार ठेकेदाराकडून प्राप्त साठा मोजून घेणे व सुरक्षितसाठवणूक करणे.

 ३८,- प्राप्त साठ्याची नोंदवही १ मध्ये प्राप्त खर्च शिल्लक साठ्याची नोंद घेणे व ग्रॕमपासूनचा हिशोब ठेवणे.

३९, - शिजवलेल्या शालेय पोषण आहाराची मुलांना अर्धा तास वाटपा अगोदर चव घेवून नोंदवही क्र.२ मध्ये नोंद घेवून त्याविषयी अभिप्राय नोंदवणे.

४०, - दर तिन माहिण्यांनी प्रत्येक विद्यार्थांची शारीरीक उंची वजन याची नोद घेवून त्याच्या प्रगतीची नोंद वही क्र.३ मध्ये घेणे.

 ४१,- स्वयंपाकी मदतनीस मानधन अदा करुन त्याचे कॕशबुक मेंटन करणे.

४२, - शालेय पोषण आहाराच्या वाटपाची,स्वच्छतेची भांडी धुनी व्यवस्था करणे

४३,- महिण्याच्या शेवटी संपूर्ण माहितीची डाग तयार करुन पाठवणे.

४४,- राजु मिना मंच उपक्रम राबवणे

४५,- विद्यार्थ्यांची अफलातुन बँक चालवने.

* *आरोग्य खात्यासी सबंधित योजनांची अंमलबजावणी*

४६,- प्रत्येक मुलांची आरोग्य  तपासणी  करुन घेणे.

४७,- आरोग्य तपासणी कार्डच्या नोंदी ठेवणे.

४८,- सर्वप्रकारच्या धनुर्वात रुबेला.... लसिकरण मोहिम राबविणे.

४९,- लोहयुक्त गोळ्यांचे वाटप व नोंदी ठेवणे.

५०,- दिव्यांग विद्यार्थांसाठी विशेष कृतिकार्यक्रम राबविने.

५१,- राजीव गांधी अपघात विमा योजनेची अंमलबजावणी करणे.

५२,- अस्मिता योजनेची अंमलबजावणी करणे.

५३,- शाळेचा कृतिआराखडा तयार करणे.

* *विविध शिष्यवृत्ती योजनांची अंमलबजावणी*

५४,- पूर्व उच्च प्राथमिक इयता ५ वी व पूर्व माध्यमिक इयता ८ वी शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करुन घेणे.फार्म आनलाईन भरणे, हॉल टिकीट काढणे परिक्षार्थींना पराक्षाकेंद्रावर ने आन करण्याची व्यवस्था करणे.

५५,- नवोदय परिक्षेची तयारी करुन घेणे,फार्म भरणे हॉल टिकीट काढणे परिक्षार्थींना परिक्षा केंद्रावर ने आन करण्याची व्यवस्था करणे.

५६,- विद्यावेतन शिष्यवृत्ती परिक्षेची वरिलप्रमानेच कार्यवाही करणे.

५७,- आदिवासी सुवर्णमहोत्सवी शिष्यवृत्तीचे सर्व कागदपत्रासह प्रस्ताव तयार करुन आनलाईन करणे.

५८,- सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती प्रस्ताव तयार करुन पाठविने.

५९,- अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती प्रस्ताव तयार करुन सादार करणे

६०,- अस्वच्छ कामगारांच्या मुलांना शिष्यवृत्ती प्रस्ताव तयार करुन सादर करणे.

* *शालेय दस्तावेज अद्यावत ठेवणे*

६१,- विद्यार्थ्याना दाखल करतांना प्रतीज्ञालेख रजिस्टरमध्ये नोंद घेणे.

६२,- विद्यार्थांना दाखल करुन घेणे त्याविषयीची संपूर्ण माहिती दाखल खारीज रजिस्टरमध्ये नोंदविने.

६३,- विद्यार्थांच्या वर्गवार दैनिक उपस्थीती हजेरीची नोंद ठेवणे.

६४,- शिक्षक उपस्थीती नोंद रजिस्टर ठेवणे.

६५,- चाचण्या सत्र परिक्षा घेवून निकाल रजिस्टर अध्यावत ठेवणे.

६६,- प्रमोशन रजिस्टर अध्यावत ठेवणे.

६७,- साठापंजी रजिस्टर अद्यावत ठेवणे.

६८,- BPLमुलींचा उपस्थीती भत्ता प्रस्ताव रजि.अद्ययावत ठेवणे.

६९,- उपस्थिती भत्ता वितरण रजिस्टर आद्यावत ठेवणे.

७०,- सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्ती वितरण रजि. अद्यावत ठेवणे.

७१,- सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती रजिस्टर अद्यावत ठेवणे.

७२,- अस्वच्छ कामगारांच्या पाल्यांच्या शिष्यवृत्ती नोंद तथा वितरण रजि.अद्यावत ठेवणे.

७३,- आवक नोंद रजिस्टर अद्यावत ठेवणे.

७४,- जावक नोंद रजि.अद्यावत ठेवणे.

७५,- टी,सी.देणे व त्याची नोंद रजिस्टर मेंटन करणे.

७६,- व्हिजीट रजिस्टर अद्यावत ठेवणे.

७७,- आरोग्य तपासणी रजिस्टर अद्यावत ठेवणे.

* *लेखादस्तके(कॕशबुक) जमाखर्च नोंद रजिस्टरे*

७८,- सर्वशिक्षा अभियान SSA अनुदान गणवेश अनुदान,शाळा अनुदान,बांधकाम,जमा खर्च हिशोब कॕशबुक मेंटन करुन नियमित लेखापरिक्षण (आॕडिट) करुन घेणे.

७९,- सादिल खात्यात जमा झालेल्या शिष्यवृत्या उपस्थीती भत्ता वाटप करुन जमा खर्च कॕशबुक मेंटन करणे व नियमित लेखापरिक्षण करुन घेणे.

८०,- शालेय पोषण आहार खाते MDM स्वयंपाकिचे जमा मानधन आदा करुन स्वतंत्र कॕशबुक मेंटन करणे व नियमित लेखा परिक्षण करुन घेणे.

८१,- शाळा सुधार फंड अंतर्गत लोकवर्गणी गोळा करुन शाळेच्या आवश्यक गरजा पूर्ण करणे त्याचे स्वतंत्र कॕशबुक मेंटेन करणे.

८२,- प्रत्येक खात्यात जमा झालेल्या हेडवाईज  जमा खर्चाच स्वतंत्र रजिस्टर ठेवणे.

८३,- नियमित पासबुक नोंदी घेणे.

८४,- शाळेचे इलेक्ट्रिक बील भरणे

८५,- मोफत गणवेश योजना कापड खरेदी निविदा मागवणे,कापड घेणे दर्जीकडून शिवून घेणे,वाटप करणे त्याच्या गणवेश वाटप रजिस्टरमध्ये नोंदी ठेवणे

८६,- मोफत पाठ्यपुस्तक योजना पटसंख्येनुसार वर्गवार पुस्तकाची मागणी करणे.तालुका केंद्रस्थळावरुन पुस्तके आणने ती प्रत्येक विद्यार्थ्यांना वाटप करणे.पुस्तक वाटप रजिस्टर वर स्वाक्षरी सह नोंदी घेणे,

८७,- प्रत्येक खर्चाचे उपयोगीता प्रमाणपत्र सादर करणे.

* *आॕनलाईन कामे*

८८,- शालेय पोषण आहार MDM स्टाॕक आनलाईन करणे,

८९,- दैनंदिन शालेय पोषण आहार लाभार्थांचे आॕनलाईन करणे.

९०,- स्कुल पोर्टलची माहिती आॕनलाईन करणे.

९१,- स्टुडंट पोर्टलची माहिती आॕनलाईन करणे.

९२,- प्रत्येक विद्यार्थांच्या चाचण्या परिक्षांचे गुण आॕनलाईन करणे

९३,- शाळा सिद्धी माहिती आॕनलाईन करणे.

९४,- सर्व दाखल विद्यार्थांची माहिती आॕनलाईन करणे.

९५,- आॕनलाईन विद्यार्थ्यांना डिटॕच अटॕच करणे.

* *फाईल्स*

९६,- प्रत्येक हेड वाईज कॕशबुक च्या खर्चाच्या पावत्यांचे स्वतंत्र चिकट फाईल्स.

९७,- आवक फाईल

९८,- जावक फाईल

९९,- प्रत्येक शिष्यवृतीचे स्वतंत्र फाईल

१००,- पगार पत्रक फाईल

१०१,- शालेय पोषण आहार फाईल

१०२,- टी.सी.फाईल

१०३,- जन्म तारिख दाखले फाईल

१०४,- रजा फाईल

१०५,- आर्डर फाईल

* *प्रशिक्षणे व इतर उपक्रम*

१०६,- वर्गवार प्रत्येक विषयाची केंद्र ते जिल्हा राज्य स्तरापर्यंतची प्रशिक्षणे

१०७,- मासिक शैक्षणिक परिषदा

१०८,- वेळोवेळी मु,अ.सभा

१०९,- गट सम्मेलने

११०,- बिटस्तरीय क्रिडा व सांस्कृतिक महोत्सव

१११,- तालुकास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव

११२,- जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव 

११३,- पंच तथा इतर समित्यात कार्य

११४,- नवरत्न स्पर्धा केंद्रस्तर ते जिल्हास्तरपर्यंत

११५,तंत्रस्नेही प्रशिक्षणे

११६,शालेय व्यवस्थापण समित्यांना प्रशिक्षण देणे.

* *मेळाव्यांचे आयोजन करणे*

११७,- पालक मेळाव्याचे आयोजन करणे.

११८,- महिला मेळाव्याचे आयोजन करणे.

११९,- बाल आनंद मेळाव्याचे आयोजन करणे.

१२०,- विद्यार्थ्यांसाठी सहलीचे आयोजन व नियोजन करणे.

१२१- सांस्कृतिक कार्यक्रमाचे , आयोजन करणे.

१२२,-राष्ट्रीय सण,वर्षभर सर्व महापुरुषांच्या जयंत्या पुण्यतिथ्या प्रभात फेर्या काढून साजर्या करणे.

हे सर्व करुन एका शिक्षकाला दोन दोन तीन तीन वर्गाचे अध्यापण करावे लागते.

*अध्यापण कार्य*

१२३,- वार्षिक मासिक नियोजन करणे.

१२४,- वेळापत्रक तयार करुन त्यानुसार अध्यापण करणे.

१२५,- नियमित दैनिक टाचन काढणे.

१२६,- लाॕगबुक मेंटन करणे.

१२७,- मुलांचा गृहपाठ तपासने.

१२८,- घटक चाचण्या घेणे.

१२९,- सत्र परिक्षा घेणे.

१३०,- पेपर्स तपासने.

१३१,- निकालपत्रक तयार करणे.

१३२,- दैनंदिन नोंदी घेणे.

१३३,- प्रत्येक विद्यार्थ्यांचे गुणपत्रक तयार करणे.

१३४,- निकाल जाहिर करणे.

१३५,- शाळेत वाचनालय चालवणे

१३६,- प्रयोगशाळा तयार करणे.

१३७,- वेगवेगळ्या विषयाचे कोपरे तयार करणे.

१३८,- घटकानुरुप शैक्षणिक साहित्ये तयार करणे.

१३९,- संगणक कक्ष तयार करुन विद्यार्थ्यांना संगणक प्रशिक्षण देणे. एवढंच नव्हे तर वेळोवेळी शासनाचे रोज येणारे सर्कुलर्स हा उपक्रम राबवा तो उपक्रम राबवा अहवाल सादर करा,ही लिंक भरा ती लिंक भरा ,आपत्ती निवारण शिक्षकाकडेच अबब....

एवढे करुनही आमच्यावर वाॕच ठेवणार्या यंत्रणेची लांब लचक यादी आहे.

१४०,-प्रत्येक पालक

१४१,-सर्व शालेय समित्या

१४२,-ग्रामपंचायत कमेटी

१४३,-केंद्र प्रमुख

१४४,-शिक्षण विस्तार अधिकारी

१४५,- गटशिक्षणाधिकारी

१४६,-शिक्षणाधिकारी

१४७,-मुख्य कार्यपालन अधिकारी

१४८,-शिक्षण उपायुक्त

१४९,-शिक्षण आयुक्त

१५०,-शिक्षण मंत्री......इ.

१५१,शेवटी वार्षिक शालेय तपासणी. 

      एवढं करुनही आम्ही फुकटचा पगार घेतो का? पगाराव्यतीरीक्त कसलाही अवैध मार्गाने एक रुपयासुद्धा न घेणारा या देशात प्रामाणिक एकमेव शिक्षकच आहे. मग त्याच्या पगाराचाच भाग असलेले चार दोन हजार घरभाडे आपल्याला का सलते? सरकारने मुख्यालयी क्वार्टर बांधुन देण्याची व्यवस्था करावी आम्ही  घरभाड मागणार पण नाही. गांव खेड्यात राहणाऱ्या लोकांचीच घरात राहण्याची वाताहत आहे तेव्हा आम्हाला  राहायला ते भाड्यने कुठून देणार?

  आपण जे गुणवत्तेबाबत बोललात तेव्हा सांगावसं वाटते की गेल्या वीस वर्षापासून शिक्षक भरतीच केली नाही. बरेच शिक्षक दर महिण्याला निवृत्त होत आहे.शिक्षकाच्या हजारो जागा रिक्त आहे. एका एका शिक्षकाला चार चार वर्ग सांभाळावे लागत आहे. तेव्हा शिक्षकांच घरभाड बंद करण्यासाठी आवाज उठवण्यापेक्षा शिक्षक भरतीसाठी,जुण्या पेंशन योजनेसाठी आवाज उठवला असता तर समाजाचं भलं झालं असतं. 

   महोदय खरं तर आपण हा प्रश्न का उठवत नाही की पाच वर्ष विधायक झाला की कोट्यावधी माया त्याच्याकडे कशी जमा होते. आम्ही ५८ वर्ष सेवा करुन जुनी पेंशन नाही मग अशा कोट्याधिश विधायकाला पेंशनची का गरज? या आजी माजी विधायकांच्या संरक्षण, सोई सवलती तथा पेंशन मध्येचं या देशातल्या कष्टकऱ्यांच रक्त शोषल्या जात आहे यावर आपण आवाज का उठवत नाही?

     

----------------------

Tuesday, 23 August 2022

लिंक मतदान कार्ड आणि आधार


 सर्व मतदार बंधू-भगिनींना विनंती आहे की खाली दिलेल्या लिंक वर कृपया क्लिक करून भारत निवडणूक आयोगाच्या वोटर हेल्प ॲपवर जाऊन आपले आधार कार्ड क्रमांक हा आपल्या मतदार ओळखपत्रशी जोडून घ्यावा. विशेषतः  महाविद्यालयीन तरुण तरुणी ,समाजसेवक ,सामाजिक संस्था या सर्वांना विनंती की आपले नातलग, मित्र या सर्वांना नोंदणी करण्यासाठी प्रोत्साहित करावे. ज्यांच्याकडे स्मार्ट फोन नाही त्यांना नोंदणी साठी मदत करावी. 🙏🏻 तसेच हा मेसेज ला जास्तीत जास्त लोकांपर्यत पोहोचवावे.

लिंक करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून ॲप डाऊनलोड करा 

https://play.google.com/store/apps/details?id=com.eci.citizen 

🇳🇪🇳🇪🇳🇪🇳🇪🇳🇪🇳🇪🇳🇪🇳🇪🇳🇪

वरील ॲप डाऊनलोड करून खालील प्रमाणे कृती करा


*आपले निवडणूक ओळखपत्र आधारसोबत लिंक करणे झाले अगदी सोपे*


खालील प्रक्रिया FOLLOW करा

               👇


👉 *Voter Helpline हे app डाऊनलोड करा*    

                     ⬇️

👉 *Voter Registration ला क्लिक करा*          

                     ⬇️

👉 *फॉर्म 6 b ला क्लिक करा* 

                     ⬇️

👉 *Lets start ला क्लिक करा* 

                     ⬇️

👉  *आपला मोबाईल नंबर टाका*

                     ⬇️

👉  *आपल्याला OTP येईल तो टाका* 

                     ⬇️

👉 *OTP टाकल्यानंतर verify ला क्लिक करा*   

                     ⬇️

👉 *Voter id असेल तर Yes I have voter ID  हे निवडा* 

                     ⬇️

👉 *Voter id नंबर टाका व राज्य maharastra निवडा* 

                     ⬇️

👉 *नंतर proceed क्लिक करा* 

                     ⬇️

👉 *आता तुमचा आधार नंबर टाका**

                     ⬇️

👉 *Done करा व confirm ला क्लिक करा.*


*तुमचे आधार निवडणूक ओळ्खपत्राला जोडल्याचा संदेश येईल.*

Thursday, 18 August 2022

MAHABHARAT

संपूर्ण महाभारत ऑनलाईन पाहण्यासाठी खालील लिंकवर टच करा




Sunday, 15 May 2022

वरीष्ठ / निवड वेतनश्रेणी प्रशिक्षणासाठी नाव नोंदणी केलेल्या शिक्षकांची यादी

 वरीष्ठ / निवड वेतनश्रेणी प्रशिक्षणासाठी नाव नोंदणी केलेल्या शिक्षकांची यादी


https://training.scertmaha.ac.in/Lists/SchoolList.aspx


इतर महत्त्वाची माहिती आपल्याला वैयक्तिक ईमेल द्वारे व मोबाईल मेसेजद्वारे लवकरच कळविण्यात येईल..

Friday, 29 April 2022

UPSTOX DEMAT

DMAT ACCOUNT
WHY OPEN DEMAT ACC

डिमॅट खाते गुंतवणूकदारांना इलेक्ट्रॉनिकमध्ये शेअर्स आणि सिक्युरिटीज ठेवण्यास मदत करते

स्वरूप अशा प्रकारच्या खात्याला डिमटेरिअलाइज्ड खाते असेही म्हणतात. एखाद्या व्यक्तीने शेअर्स, एक्सचेंज ट्रेडेड फंड, बाँड्स आणि म्युच्युअल फंडांमध्ये केलेल्या सर्व गुंतवणुकीचा योग्य मागोवा ठेवण्यास देखील हे मदत करते.

DMAT ACC उघडण्यासाठी प्रोसेस समजून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

आपले D-MAT खाते उघडण्यासाठी खालील PICTURE ला अथवा लिंकला क्लिक करा

https://link.upstox.com/zvbG

Sunday, 17 April 2022

UDISE+

UDISE+ FORM BLANK FORM(इंग्रजी)

For download click below link

https://drive.google.com/file/d/1abu-HPLaEMA2MhVokpxUJfZO5CBFD5kp/view?usp=drivesdk 

वरील कोरा फॉर्म download करून भरावा 


U DISE यु डायस फॉर्म मिळवा वर्ड फॉरमॅट जो एडिट म्हणजेच बदल करता येतो डायरेक्ट माहिती भरून प्रिंट काढता येते असा फॉरमॅट
DOWNLOAD करा खालील लिंकला क्लिक करून

https://docs.google.com/document/d/1aub7puaZAxkZ4oZMpwOjJyuOahN2nYZq/edit?usp=drivesdk&ouid=108829016877804590604&rtpof=true&sd=true

note:change year as per requirement


UDISE+ login page

सदर लिंक लॉगिन करण्यासाठी युझर नेम आणि पासवर्ड तालुका स्तरावरून प्राप्त होतो

 For login page click on below link

https://udiseplus.gov.in/udiseplus//



Thursday, 14 April 2022

तत्त्वनिष्ठ

 .*कृपया कितीही Busy असाल तरी,*

*ही पोस्ट एकदा नक्की वाचा, अगदी निवांत तुमच्या जिवनात 1000% फरक पडनार...* 🙏


        *● तत्त्वनिष्ठ ●*

 

*"अहो ऐकलंत का? राहूलचा डबा नेऊन देता का जरा कंपनीत?"*


*"का राहूलने नेला नाही डबा?"* शरदरावांनी विचारलं.


*"आज राहूलच्या कंपनीचे चेअरमन येत आहेत म्हणून राहूल सकाळी सातलाच गेलाय कंपनीत." त्यामुळे सकाळी लवकर डबा तयार नाही झाला.*


*"ठीक आहे. देतो मी नेऊन."*

शरदरावांनी हातातला पेपर बाजूला ठेवला आणि ते कपडे घालण्यासाठी आतमध्ये गेले.

पुष्पाबाईंनी सुटकेचा निःश्वास सोडला.


शरदराव तयार झाले म्हणजे त्यांचा आणि राहूलचा झालेला वाद त्यांनी ऐकला नव्हता. वाद कसला, राहूलचं नेहमीप्रमाणे आपल्या वडिलांवर आगपाखड करणं आणि पुष्पाबाईंचं नवऱ्याची बाजू घेणं. विषयही तोच *'वडिलांनी आमच्यासाठी काही केलं नाही.'* काय केल माझ्यासाठी बापाने हा चुकीचा समज त्याच्या मनात रुजला होता,


*"आई माझ्या मित्राचे वडीलही शिक्षक होते, पण किती मोठा बंगला बांधलाय् बघ. नाहीतर नाना! अजूनही आम्हांला भाड्याच्या घरात ठेवत आहेत."*

राहूल तावातावाने बोलत होता.


*"राहूल तुला माहीत आहे की, नाना घरात मोठे. त्यामुळे दोन बहिणी आणि दोन भावांची लग्नं त्यांनाच करावी लागली. शिवाय तुझ्या बहिणींची लग्नंही त्यांनीच केली. आपल्या शेताच्या कोर्टकचेऱ्या सुरू होत्या. अशा सगळ्या जबाबदाऱ्या होत्या. कुणी पार पाडल्या त्या?"*


 *"काय उपयोग झाला त्याचा?त्यांचे भाऊबहीण बंगल्यात राहात आहेत. कधीतरी वाटतं का त्यांना की आपला भाऊ आपल्यासाठी खस्ता खाताना साधं घर बांधू शकला नाही तर आपण त्याला घर बांधून द्यावं?"*


क्षणभर पुष्पाताईच्या डोळ्यातून पाणी आले, काय बोलावं जन्म दिलेला मुलगा बापाने काय केले माझ्यासाठी विचारतोय . मग म्हणाल्या,

*"तुझ्या वडिलांनी त्यांचं कर्तव्य केलं. भावा-बहिणींकडून कधीही अपेक्षा बाळगली नाही."*


*"राहूल मुर्खा सारखे म्हणत होता बरं ते ठीक आहे. हजारो मुलांच्या नानांनी ट्युशन्स घेतल्या. त्यांच्याकडून जर फी घेतली असती तर आज नाना पैशात लोळले असते. आजकालचे क्लासवाले पाहा. इंपोर्टेड गाड्यांत फिरतात."*


*"हे तू बरोबर म्हणतो आहेस. पण नानांचं तत्त्व होतं, ज्ञानदानाचे पैसे घ्यायचे नाहीत म्हणून. या त्यांच्या तत्त्वामुळेच तर ते किती प्रसिद्ध होते. किती पुरस्कार मिळाले आहेत त्यांना कल्पना आहे तुला?"*


ते ऐकताच राहूल एकदम संतापला. *"काय चाटायचे आहेत ते पुरस्कार आई? त्या पुरस्कारांनी घर थोडीच बांधता येतं? पडले आहेत धूळ खात!कोणी विचारत नाही त्यांना!"*


तेवढ्यात दार वाजलं. राहूलने दार उघडलं तर शरदराव उभे होते. वडिलांनी आपलं बोलणं ऐकलं तर नाही ना या भीतीने राहूलचा चेहरा उतरला. पण शरदराव न बोलता आत निघून गेले आणि तो वाद तिथंच संपला.

हे होते पुष्पाताई व राहूलचे कालचे  भांडण , पण आज 

शरदरावांनी सायकलला डबा अडकवला आणि भर उन्हात ते औद्योगिक वसाहतीतल्या राहूलच्या कंपनीकडे निघाले. सात किलोमिटरवरच्या कंपनीत पोहचता पोहचता त्यांना चांगलीच धाप लागली होती. कंपनीच्या गेटवर पोहचल्यावर सिक्युरिटी गार्डने त्यांना अडवलं.


*"राहूल पाटील साहेबांना डबा द्यायचा होता. जाऊ का आत?"*


*"आता नाही देता येणार.."* गार्ड म्हणाला, *"चेअरमनसाहेब आलेत. त्यांच्यासोबत मिटींग सुरू आहे. कोणत्याही क्षणी ते मिटींग संपवून बाहेर येतील. तुम्ही बाजूला थांबा. चेअरमनसाहेबांना तुम्ही दिसायला नको."*


शरदराव थोड्या दूर अंतरावर उन्हातच उभे राहिले. आजूबाजूला कुठेही सावली नव्हती. थोडा वेळ म्हणता म्हणता एक तास उलटून गेला. पाय दुखायला लागले म्हणून शरदराव तिथेच एका तापलेल्या दगडावर बसणार तोच गेटचा आवाज आला. बहुदा मिटींग संपली असावी.


चेअरमनसाहेबांच्या पाठोपाठ अधिकारी आणि त्यांच्यासोबत राहूलही बाहेर आला. उभ्या असलेल्या वडिलांकडे पाहून तो मनात चरफडला.


चेअरमनसाहेबांनी गाडीचं दार उघडलं आणि बसता बसता त्यांचं लक्ष शरदरावांकडे गेलं. गाडीत न बसता ते तसेच बाहेर थांबले.


*"ते समोर कोण उभे आहेत?"* त्यांनी सिक्युरिटीला विचारलं.


*"आपल्या राहूल साहेबांचे वडील आहेत. जेवणाचा डबा द्यायला आलेत."* सिक्युरिटीने घाबरल्या आवाजात सांगितलं.


*"बोलवा त्यांना."*


नको ते घडलं होतं. राहूलच्या अंगातून घामाच्या धारा वाहू लागल्या. संताप आणि भीतीने डोकं फुटेल असं त्याला वाटू लागलं.


सिक्युरिटीने आवाज दिल्यावर शरदराव जवळ आले. चेअरमनसाहेब पुढे होऊन त्यांच्याजवळ गेले.


*"तुम्ही पाटील सर ना? डी.एन. हायस्कूलमध्ये तुम्ही शिक्षक होता?"*


*"हो. तुम्ही कसं ओळखता मला?"*


काही कळायच्या आत चेअरमनसाहेबांनी शरदरावांचे पाय धरले. सगळे अधिकारी आणि राहूलही ते दृश्य पाहून अवाक् झाले.


*"सर, मी अतिश अग्रवाल. तुमचा विद्यार्थी होतो. बघा तुम्ही मला घरी शिकवायला यायचात."*


*"हो. हो. आठवलं. बाप रे बरेच मोठे झालात की तुम्ही..."*


चेअरमन हसले. मग म्हणाले, *"सर तुम्ही इथे उन्हात काय करताय? चला आतमध्ये बसू. खूप गप्पा मारायच्यात तुमच्याशी. सिक्युरिटी तुम्ही यांना आत का नाही बसवलंत?"* सिक्युरिटीने शरमेने मान खाली घातली.


ते पाहून शरदरावच म्हणाले, *"त्यांची काही चूक नाही. तुमची मिटींग चालू होती. तुम्हांला त्रास नको म्हणून मीच बाहेर थांबलो."*


*"ओके... ओके...!"*

चेअरमनसाहेबांनी शरदरावांचा हात धरला आणि ते त्यांना आपल्या आलिशान चेंबरमध्ये घेऊन गेले. *"बसा सर."* आपल्या खुर्चीकडे बोट दाखवत चेअरमन म्हणाले.


*"नाही. नाही. ती खुर्ची तुमची आहे."* शरदराव गडबडून म्हणाले.


*"सर, तुमच्यामुळे ती खुर्ची मला मिळालीय्. तेव्हा पहिला हक्क तुमचा."*


चेअरमनसाहेबांनी बळजबरीनेच त्यांना आपल्या खुर्चीत बसवलं.


*"तुम्हांला माहीत नसेल पवार सर.."* जनरल मॅनेजरकडे पाहत चेअरमन म्हणाले, *"पाटील  सर नसते तर आज ही कंपनी नसती आणि मी माझ्या वडिलांचं धान्याचं दुकान सांभाळत बसलो असतो."*


राहूल आणि जी.एम. दोघंही आश्चर्याने त्यांच्याकडे पाहत राहिले.


*"शाळेत असताना मी अतिशय 'ढ' विद्यार्थी होतो. कसाबसा ढकलत शाळेने मला नववीपर्यंत आणलं. शहरातल्या सर्वोत्तम क्लासेसमध्ये मला टाकलं गेलं. पण मला शिकण्यातच गोडी नव्हती. त्यातून श्रीमंत बापाचा लाडका लेक. दिवसभर शाळेत माऱ्यामाऱ्या करायच्या. आणि संध्याकाळी क्लासेस चुकवून मुव्ही पाहायच्या हे माझे उद्योग. आईला ते सहन होईना. त्या वेळी पाटील सर कडक शिस्तीचे आणि उत्कृष्ट शिकवणारे म्हणून प्रसिद्ध होते. आईने त्यांच्याकडे जाऊन मला शिकवण्याची विनंती केली. पण सरांच्या छोट्याशा घरात बसायला जागा नव्हती, म्हणून सरांनी नकार दिला. आईने सरांच्या विनवण्या केल्या आणि आमच्या घरी येऊन शिकवायची विनंती केली. मागाल ती फी देण्याची तयारी दाखवली. सरांनी फी घ्यायला नकार दिला पण आढेवेढे घेत घरी येऊन शिकवायला तयार झाले. पहिल्या दिवशी सर आले. मी नेहमीप्रमाणे खोड्या करायला सुरुवात केली. सरांनी मला चांगलं बदडून काढलं. मी मुकाट्याने बसायला सुरुवात केली. तुला सांगतो राहूल पहिल्याच आठवड्यात मला अभ्यासात गोडी वाटायला लागली. नंतर तर अभ्यास केल्याशिवाय मला करमायचं नाही. सर इतके छान शिकवायचे इंग्लिश, गणित, सायन्स हे विषय जे मला कठीण वाटायचे ते खूप सोपे वाटायला लागले. सर कधी आले नाहीत तर मला अस्वस्थ वाटायचं. नववीत मी वर्गात दुसरा आलो. आईवडिलांना खूप आनंद झाला. मी तर हवेत तरंगत होतो. दहावीत मी सगळे क्लासेस सोडले आणि फक्त पाटील सरांकडे शिकू लागलो. आणि दहावीत मेरीटमध्ये येऊन मी सगळ्यांना आश्चर्याचा धक्काच दिला."*


*"माय गुडनेस...! पण सर मग तुम्ही सरांना तरीसुद्धा फी दिली नाहीत?"* जनरल मॅनेजरनी विचारलं.


*"मी आईवडिलांसोबत सरांकडे पेढे घेऊन गेलो. वडिलांनी सरांना एक लाखाचा चेक दिला. सरांनी तो घेतला नाही. सर त्या वेळी काय म्हटले ते अजूनही माझ्या लक्षात आहे. ‌सर म्हणाले, 'मी काहीही केलेलं नाही. तुमचा मुलगाच हुशार होता. मी फक्त त्याला मार्ग दाखवला. आणि मी ज्ञान विकत नाही, मी ते दान करतो'. नंतर मी सरांच्या मार्गदर्शनाखालीच बारावीत परत मेरीटमध्ये आलो. पुढे बी. ई. झाल्यावर मी अमेरिकेत जाऊन एम.एस. केलं. आणि आपल्याच शहरात ही कंपनी सुरू केली. एका दगडाला सरांनी हीरा बनवलं. आणि मीच नाही तर सरांनी असे असंख्य हिरे घडवले आहेत. सर तुम्हांला कोटी कोटी प्रणाम...!!"*


चेअरमनसाहेबांनी डोळ्यांत आलेलं पाणी रुमालाने पुसलं.

*‌"पण कमालच म्हटली पाहिजे. बाहेर शिक्षणाचा आणि ज्ञानदानाचा बाजार भरलेला असताना एक रुपया न घेता हजारो विद्यार्थ्यांना शिकवणं, नुसतं शिकवणं नाही तर त्यांच्यात अभ्यासाची गोडी निर्माण करणं. व्वा सर, मानलं तुम्हांला..."* शरदरावांकडे पाहत जी. एम. म्हणाले.


*‌"अहो सर, ही माणसं तत्त्वनिष्ठ होती. पैशाची, मानसन्मानाची भुकेली नव्हती. विद्यार्थ्यांचं भलं व्हावं हा एकमेव उद्देश असायचा."* चेअरमनसाहेब म्हणाले.


*"माझे वडिलही त्यातलेच. 'एक वेळ उपाशी राहू, पण धान्यात भेसळ करून विकणार नाही' हे त्यांचं तत्त्व होतं. आयुष्यभर त्यांनी ते पाळलं. सचोटीचा व्यापार केला. त्याचा फायदा आज माझ्या भावांना होतोय."*


‌बराच वेळ कुणी बोललं नाही. मग चेअरमननी शरदरावांना विचारलं, ‌ *"सर, तुम्ही घर बदललंय की त्याच घरात राहता?"*


*‌"त्याच जुन्या घरात राहतोय् सर!"*

‌शरदरावांऐवजी राहूलनेच त्यांचं उत्तर दिलं. त्या उत्तरातील वडिलांविषयीची चीड चेअरमनसाहेबांच्या लगेच लक्षात आली.


*‌"ठरलं तर मग. सर आज मी तुम्हांला गुरुदक्षिणा देणार आहे. याच शहरात मी काही फ्लॅटस् घेऊन ठेवलेत. त्यांतला एक थ्री बीएचकेचा फ्लॅट तुमच्या नावावर करतोय सर...!"*


*‌"काय्य?"* शरदराव आणि राहूल एकाच वेळी ओरडले. *‌"नको नको. एवढी मोठी गुरुदक्षिणा मला नकोय."* शरदराव निग्रहाने म्हणाले.


‌चेअरमनसाहेबांनी शरदरावांचे हात हातात घेतले. ‌  *"सर, प्लीज.. नाही म्हणू नका आणि मला माफ करा. कामाच्या व्यापात तुमची गुरुदक्षिणा देण्यात मी खूप उशीर केला."*


‌मग राहूलकडे पाहत त्यांनी विचारलं, ‌ *"राहूल तुझं लग्न झालंय?"*


*‌"नाही सर, ठरलंय. पण जोपर्यंत मोठं घर होत नाही तोपर्यंत लग्न होणार नाही अशी सासरच्यांची अट होती. त्यामुळे अजून तारीख नक्की केली नव्हती आणि हाॅलही बुक केला नव्हता."*


‌चेअरमननी फोन उचलला. कोणाशी तरी बोलले. मग समाधानाने फोन खाली ठेवून म्हणाले,          ‌"तुमच्या मंगल कार्यालयाचंकाम झालं.सागर लाॅन्सं माहित आहे ना?"


*‌"सर, ते तर खूप महाग..."*


*‌"अरे, तुला कुठे पैसे द्यायचे आहेत? ‌अरे, सरांचे विद्यार्थी सरांसाठी काहीही करू शकतात. सरांनी फक्त शब्द टाकायला हवा. पण सर तत्त्वनिष्ठ आहेत ते तसं करणार नाहीत. या लाॅन्सचा मालक सरांचाच विद्यार्थी आहे. त्याला मी शब्द टाकला. नुसता हाॅलच नाही, तर जेवणासकट संपूर्ण लग्नच लावून द्यायची जबाबदारी त्याने घेतलीय... तीही मोठ्या आनंदाने. तुम्ही फक्त तारीख सांगा आणि सामान घेऊन जा."*


*‌"खूप खूप धन्यवाद सर!"* राहूल अत्यानंदाने हात जोडत म्हणाला.


*‌"धन्यवाद मला नाही तुझ्या वडिलांना दे राहूल! ही त्यांचीच पुण्याई आहे. आणि मला एक वचन दे राहूल, सरांच्या अंतिम श्वासापर्यंत तू त्यांना अंतर देणार नाहीस आणि त्यांना दुखावणार नाहीस. मला फक्त कळू दे तू त्यांना त्रास देतो आहेस. या कंपनीतून तुला डच्चू तर मिळेलच पण अख्ख्या महाराष्ट्रात तुला कुठे नोकरी मिळणार नाही याची मी व्यवस्था करीन."* चेअरमन कठोर आवाजात म्हणाले.


*‌"नाही सर. मी वचन देतो तसं होणार नाही."* ‌राहूल हात जोडत म्हणाला.

‌संध्याकाळी राहूल घरी आला तेव्हा शरदराव पुस्तक वाचत होते. पुष्पाबाई जवळच भाजी निवडत होत्या. राहूलने बॅग ठेवली आणि शरदरावांचे पाय धरले.


*‌"नाना, मी चुकलो. मी तुम्हांला वाटेल ते बोलत होतो. मला माहीत नव्हतं नाना तुम्ही इतके मोठे असाल."*


 ‌शरदरावांनी त्याला उठवून छातीशी धरलं.


  ‌आपला मुलगा का रडतोय हे पुष्पाबाईंना कळेना. पण, काहीतरी नक्कीच चांगलं घडलयं म्हणून तर बापलेकात प्रेम उमळून आलंय हे पाहून त्यांचेही डोळे अश्रूंनी भरून आले.

.....................................

*एक विनंती*

  ☝ *वरील कथा वाचल्यावर तुमच्या डोळ्यातुन अश्रुचा १ थेंब जरी ओघळला असेल, तरच हि पोष्ट आपल्या स्नेही जनांना पाठवा..! आणि कृपा करुन आपल्या बापाला कधी कोणी विचारु नका काय केले? काय कमवून ठेवले माझ्यासाठी, जे कमवायचे आहे ते स्व;ता कमवा, त्यांनी जे शिक्षण व संस्कार दिले आहेत ते तेच तुम्हाला कमवायला शिकवतील...*