Thursday, 15 September 2022

रेशनकार्डमध्ये मुलाचे नाव जोडण्यासाठी

 आधार कार्ड सारखेच एक कार्ड म्हणजे रेशनकार्ड कोणत्याही सरकारी कामासाठी रेशनकार्ड मागितले जातेच. शिवाय, सरकारच्या विविध योजनांचा लाभही रेशनकार्ड धारकांना होतो. त्यामुळे प्रत्येकाकडे रेशनकार्ड असणे गरजेचे आहे. रेशनकार्ड मुळे स्वस्त धान्य मिळते, तसेच गॅस जोडणी घ्यायची असो, जात प्रमाणपत्र काढायचे असो वा अन्य दाखले…

रेशनकार्ड मागितले जातेच. अशा वेळी रेशनकार्डमध्ये मुलाचे नाव नसल्यास तुमच्या कामात अडथळा येतो. रेशनकार्डमध्ये मुलाचे नाव तुम्ही सहज जोडू शकता. यासाठी सरकारने ऑनलाईन व ऑफलाईन दोन्ही सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. आपल्या घरातील मुलाचे नाव रेशनकार्डमध्ये कसे जोडायचे, याबाबत सविस्तर जाणून घेऊ या.

आवश्यक कागदपत्रे:- रेशनकार्डमध्ये मुलाचे नाव जोडण्यासाठी मुलाचे जन्म प्रमाणपत्र, सोबत घरातील प्रमुखांचे रेशनकार्ड (फोटोकॉपी आणि मूळ
दोन्ही), दोन्ही पालकांचे आधार कार्ड आवश्यक असेल.
अर्ज करण्याची पद्धत:- सर्वप्रथम अन्नपुरवत्याच्या https://rcms.mahafood.gov.in/ वेबसाईटवर जा. वेबसाईटवर तुम्हाला लॉगिन आयडी बनवावा लागेल. आधीपासूनच लॉगिन आयडी असेल, तर त्याद्वारे लॉग इन करा. होम पेजवर नवीन सदस्य जोडण्याच्या पर्यायावर क्लिक करा. तुमच्यासमोर नवीन फॉर्म येईल. त्यावर कुटुंबातील नवीन सदस्यांची सर्व माहिती योग्य
पद्धतीने भरून फॉर्मसोबत आवश्यक कागदपत्रे अपलोड करा. फॉर्म सबमिट केल्यानंतर नोंदणी क्रमांक दिला जाईल. त्याद्वारे तुम्ही या पोर्टलवर तुमचा स्थिती चेक करू शकता. अशाप्रकारे तुम्ही तुमच्या मुलाचे नाव रेशनकार्डमध्ये जोडू शकता.

No comments:

Post a Comment