*कर्मचाऱ्याचा एकूण पगार हा बेसीक, महागाई, घरभाडे , प्रवास भत्ता मिळून बनतो, घरभाडे हा पगाराचाच भाग आहे.* --------------
शिक्षक हा देश घडवणारा व देश चालवणारा आहे.याचे कारण वेळोवेळी शासनाला आवश्यक असलेली माहिती कोणत्याही खात्याशी सबंधित असो शिक्षकच देवू शकतो आणि देत आलेला आहे, यादृष्टीने देश चालवणारा हा प्राथमिक शिक्षकच आहे.अशा या शिक्षकाला विशषतः प्राथमिक शिक्षकावर आपण मुख्यालयी राहतो असे खोटं सांगून घरभाडे घेतात असा आपण आरोप लावला परंतु आपल्या माहितीसाठी सांगतो की घरभाडे हा पगाराचाच भाग आहे याचा मुख्यालयी राहण्याचा सबंध येत नाही,जर मुख्यालयी शासनाने क्वार्टर बांधुन दिले असेल तरच घरभाड देता येत नाही. जसा महागाई प्रवास भत्ता तसेच घरभाडे ... हे सर्व मिळून साठ ते सत्तर हजार पगार बणत असतो,सरासरी त्यापेक्षाही कमी आहे. आणि हो शिक्षकाचा पगार घरभाड काढता तो सुद्धा तुम्हचं बोट धरुन अक्षर गिरवून तुम्हाला विधानसभेपर्यंत पोहचता आलं ती कोण्यातरी शिक्षकाचीच पुण्याई आहे. त्यांचासुद्धा हा अपमान आहे. बरं असो बेसीक महागाई घरभाडे सर्वकाही पकडून शिक्षकाचा सद्यस्थितीत सरासरी पगार ६० ते ७० हजार आहे.या पगाराचा हिशोब आपल्यापुढे सादर करीत आहो.
*शिक्षकांना करावी लागणारी शालाबाह्य कामे*
प्राथमिक शिक्षकाला चपरासी,बाबू,शिक्षक,मुख्याध्यापक ही चारही कामे स्वतः एकट्यालाच पार पाडावी लागते त्या कामाची माहीती.
१,- शाळा उघडणे
२,- वर्गखोल्या,परीसर,मुतार्या,संडास स्वच्छ करणे.
३,- घंटी वाजवणे.
४,- पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे.
५,- वर्गखोल्यांची रंगरंगोटी सजावट करणे.
६,- डिजिटल वर्गखोल्या तयार करणे.
* *निवडणूका*
७, - ग्रामपंचायतची निवडणूक पार पाडणे .
८, - पंचायत समितीची निवडणूक पार पाडणे
९, - जिल्हा परिषदची निवडणूक पार पाडणे .
१०,- विधानसभेची निवडणूक पार पडणे.
११, -लोकसभेची निवडणूक पार पाडणे .
१२, - मतदार याद्या तयार करण्याचे BLO म्हणून काम पार पाडणे.
* *बांधकामे*
१३,- ईमारत बांधकाम
१४,- संडास मुतार्या बांधकाम
१५,- हँडवाश स्टेशन बांधकाम
१६,- इमारत देखभाल दुरुस्ती
* *सर्वेक्षणे*
१७,- शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण करुन त्यांना शाळेत दाखल करुन शाळेच्या प्रवाहात आणने.
१८,- संपूर्ण गावाचे वयोगटानुरुप संवर्गारुप साक्षर निरक्षर सह दाखलपात्र विद्यार्थी सर्वेक्षण.
१९,- जनगणना सर्वेक्षण.
२०,- दारिद्रय रेषेखालील लोकांचे सर्वेक्षण.
२१, - पशुसर्वेक्षण
२२, - शौच्छालयाचे सर्वेक्षण
* *शालेय समित्या स्थापण करणे*
२३, - शालेय व्यवस्थापण समिती स्थापण करण्यासाठी संपूर्ण निवडप्रक्रीया पार पाडणे.
२४,- शा.व्य.स.च्या मासिक सभा व त्याचे इतिवृत्त कार्यवाही रजिस्टर मेंटन करणे.
२५,- पालक समिति निवड करणे,दरमहा सभा घेणे व त्याचे इतिवृत्त कार्यवाही रजिस्टर मेंटन करणे.
२६,- मातापालक समिती निवड करणे.दरमहा सभा घेणे,त्याचे इतिवृत्त कार्यवाही रजि.मेंटन करणे .
२७,- शालेय पोषण आहार समिती निवड करणे,दरमहा सभा घेणे, इतिवृत्त कार्यवाही रजि.मेंटन करणे.
२८, - विद्यार्थीनी सुरक्षा समिती तयार करणे,सभा घेणे इतिवृत्त कार्यवाही रजिस्टर मेंटन करणे.
२९,- तंबाखू व्यसनमुक्त समिती तयार करणे मासिक सभा घेणे इतिवृत्त कार्यवाही रजि.मेंटन करणे.
३०,- तंबाखू मुक्त शाळा घोषीत करणे.
३१, - विद्यार्थी परिवहन समिती तयार करणे मासीक सभा घेणे इतिवृत्त कार्यवाही रजि.मेंटन करणे.
३२,- गावातील तंटामुक्त व इतर समित्यांवर पदसिद्ध सदस्य म्हणून मु.अ.ना भुमिका पार पाडावी लागते.
३३,- ग्रामसेवकाच्या अनुपस्थीतीत ग्रामसभेचा सचिव म्हणून मु.अ.ना भुमिका निभवावी लागते.
* *विविध शालेय योजनांची अंमलबजावणी करणे*
३४,- शालेय पोषण आहार योजने अंतर्गत स्वयंपाकीची व मदतनीसाची निवड करणे.
३५, - स्वयंपाकीची व मदतनीसाची करारनामे,बॕकखाते,आधार,मेडिकल सर्टिफिकेट इ.दस्तावेज फाईल तयार करुन कार्यालयाला सादर करणे, माहिती अॉनलाईन करणे.
३६,- रोजच्या उपस्थितीनुसार शालेय पोषण आहार लाभार्थांची रोजची रोज माहिती आनलाईन करणे.
३७, - शालेय पोषण आहार ठेकेदाराकडून प्राप्त साठा मोजून घेणे व सुरक्षितसाठवणूक करणे.
३८,- प्राप्त साठ्याची नोंदवही १ मध्ये प्राप्त खर्च शिल्लक साठ्याची नोंद घेणे व ग्रॕमपासूनचा हिशोब ठेवणे.
३९, - शिजवलेल्या शालेय पोषण आहाराची मुलांना अर्धा तास वाटपा अगोदर चव घेवून नोंदवही क्र.२ मध्ये नोंद घेवून त्याविषयी अभिप्राय नोंदवणे.
४०, - दर तिन माहिण्यांनी प्रत्येक विद्यार्थांची शारीरीक उंची वजन याची नोद घेवून त्याच्या प्रगतीची नोंद वही क्र.३ मध्ये घेणे.
४१,- स्वयंपाकी मदतनीस मानधन अदा करुन त्याचे कॕशबुक मेंटन करणे.
४२, - शालेय पोषण आहाराच्या वाटपाची,स्वच्छतेची भांडी धुनी व्यवस्था करणे
४३,- महिण्याच्या शेवटी संपूर्ण माहितीची डाग तयार करुन पाठवणे.
४४,- राजु मिना मंच उपक्रम राबवणे
४५,- विद्यार्थ्यांची अफलातुन बँक चालवने.
* *आरोग्य खात्यासी सबंधित योजनांची अंमलबजावणी*
४६,- प्रत्येक मुलांची आरोग्य तपासणी करुन घेणे.
४७,- आरोग्य तपासणी कार्डच्या नोंदी ठेवणे.
४८,- सर्वप्रकारच्या धनुर्वात रुबेला.... लसिकरण मोहिम राबविणे.
४९,- लोहयुक्त गोळ्यांचे वाटप व नोंदी ठेवणे.
५०,- दिव्यांग विद्यार्थांसाठी विशेष कृतिकार्यक्रम राबविने.
५१,- राजीव गांधी अपघात विमा योजनेची अंमलबजावणी करणे.
५२,- अस्मिता योजनेची अंमलबजावणी करणे.
५३,- शाळेचा कृतिआराखडा तयार करणे.
* *विविध शिष्यवृत्ती योजनांची अंमलबजावणी*
५४,- पूर्व उच्च प्राथमिक इयता ५ वी व पूर्व माध्यमिक इयता ८ वी शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करुन घेणे.फार्म आनलाईन भरणे, हॉल टिकीट काढणे परिक्षार्थींना पराक्षाकेंद्रावर ने आन करण्याची व्यवस्था करणे.
५५,- नवोदय परिक्षेची तयारी करुन घेणे,फार्म भरणे हॉल टिकीट काढणे परिक्षार्थींना परिक्षा केंद्रावर ने आन करण्याची व्यवस्था करणे.
५६,- विद्यावेतन शिष्यवृत्ती परिक्षेची वरिलप्रमानेच कार्यवाही करणे.
५७,- आदिवासी सुवर्णमहोत्सवी शिष्यवृत्तीचे सर्व कागदपत्रासह प्रस्ताव तयार करुन आनलाईन करणे.
५८,- सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती प्रस्ताव तयार करुन पाठविने.
५९,- अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती प्रस्ताव तयार करुन सादार करणे
६०,- अस्वच्छ कामगारांच्या मुलांना शिष्यवृत्ती प्रस्ताव तयार करुन सादर करणे.
* *शालेय दस्तावेज अद्यावत ठेवणे*
६१,- विद्यार्थ्याना दाखल करतांना प्रतीज्ञालेख रजिस्टरमध्ये नोंद घेणे.
६२,- विद्यार्थांना दाखल करुन घेणे त्याविषयीची संपूर्ण माहिती दाखल खारीज रजिस्टरमध्ये नोंदविने.
६३,- विद्यार्थांच्या वर्गवार दैनिक उपस्थीती हजेरीची नोंद ठेवणे.
६४,- शिक्षक उपस्थीती नोंद रजिस्टर ठेवणे.
६५,- चाचण्या सत्र परिक्षा घेवून निकाल रजिस्टर अध्यावत ठेवणे.
६६,- प्रमोशन रजिस्टर अध्यावत ठेवणे.
६७,- साठापंजी रजिस्टर अद्यावत ठेवणे.
६८,- BPLमुलींचा उपस्थीती भत्ता प्रस्ताव रजि.अद्ययावत ठेवणे.
६९,- उपस्थिती भत्ता वितरण रजिस्टर आद्यावत ठेवणे.
७०,- सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्ती वितरण रजि. अद्यावत ठेवणे.
७१,- सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती रजिस्टर अद्यावत ठेवणे.
७२,- अस्वच्छ कामगारांच्या पाल्यांच्या शिष्यवृत्ती नोंद तथा वितरण रजि.अद्यावत ठेवणे.
७३,- आवक नोंद रजिस्टर अद्यावत ठेवणे.
७४,- जावक नोंद रजि.अद्यावत ठेवणे.
७५,- टी,सी.देणे व त्याची नोंद रजिस्टर मेंटन करणे.
७६,- व्हिजीट रजिस्टर अद्यावत ठेवणे.
७७,- आरोग्य तपासणी रजिस्टर अद्यावत ठेवणे.
* *लेखादस्तके(कॕशबुक) जमाखर्च नोंद रजिस्टरे*
७८,- सर्वशिक्षा अभियान SSA अनुदान गणवेश अनुदान,शाळा अनुदान,बांधकाम,जमा खर्च हिशोब कॕशबुक मेंटन करुन नियमित लेखापरिक्षण (आॕडिट) करुन घेणे.
७९,- सादिल खात्यात जमा झालेल्या शिष्यवृत्या उपस्थीती भत्ता वाटप करुन जमा खर्च कॕशबुक मेंटन करणे व नियमित लेखापरिक्षण करुन घेणे.
८०,- शालेय पोषण आहार खाते MDM स्वयंपाकिचे जमा मानधन आदा करुन स्वतंत्र कॕशबुक मेंटन करणे व नियमित लेखा परिक्षण करुन घेणे.
८१,- शाळा सुधार फंड अंतर्गत लोकवर्गणी गोळा करुन शाळेच्या आवश्यक गरजा पूर्ण करणे त्याचे स्वतंत्र कॕशबुक मेंटेन करणे.
८२,- प्रत्येक खात्यात जमा झालेल्या हेडवाईज जमा खर्चाच स्वतंत्र रजिस्टर ठेवणे.
८३,- नियमित पासबुक नोंदी घेणे.
८४,- शाळेचे इलेक्ट्रिक बील भरणे
८५,- मोफत गणवेश योजना कापड खरेदी निविदा मागवणे,कापड घेणे दर्जीकडून शिवून घेणे,वाटप करणे त्याच्या गणवेश वाटप रजिस्टरमध्ये नोंदी ठेवणे
८६,- मोफत पाठ्यपुस्तक योजना पटसंख्येनुसार वर्गवार पुस्तकाची मागणी करणे.तालुका केंद्रस्थळावरुन पुस्तके आणने ती प्रत्येक विद्यार्थ्यांना वाटप करणे.पुस्तक वाटप रजिस्टर वर स्वाक्षरी सह नोंदी घेणे,
८७,- प्रत्येक खर्चाचे उपयोगीता प्रमाणपत्र सादर करणे.
* *आॕनलाईन कामे*
८८,- शालेय पोषण आहार MDM स्टाॕक आनलाईन करणे,
८९,- दैनंदिन शालेय पोषण आहार लाभार्थांचे आॕनलाईन करणे.
९०,- स्कुल पोर्टलची माहिती आॕनलाईन करणे.
९१,- स्टुडंट पोर्टलची माहिती आॕनलाईन करणे.
९२,- प्रत्येक विद्यार्थांच्या चाचण्या परिक्षांचे गुण आॕनलाईन करणे
९३,- शाळा सिद्धी माहिती आॕनलाईन करणे.
९४,- सर्व दाखल विद्यार्थांची माहिती आॕनलाईन करणे.
९५,- आॕनलाईन विद्यार्थ्यांना डिटॕच अटॕच करणे.
* *फाईल्स*
९६,- प्रत्येक हेड वाईज कॕशबुक च्या खर्चाच्या पावत्यांचे स्वतंत्र चिकट फाईल्स.
९७,- आवक फाईल
९८,- जावक फाईल
९९,- प्रत्येक शिष्यवृतीचे स्वतंत्र फाईल
१००,- पगार पत्रक फाईल
१०१,- शालेय पोषण आहार फाईल
१०२,- टी.सी.फाईल
१०३,- जन्म तारिख दाखले फाईल
१०४,- रजा फाईल
१०५,- आर्डर फाईल
* *प्रशिक्षणे व इतर उपक्रम*
१०६,- वर्गवार प्रत्येक विषयाची केंद्र ते जिल्हा राज्य स्तरापर्यंतची प्रशिक्षणे
१०७,- मासिक शैक्षणिक परिषदा
१०८,- वेळोवेळी मु,अ.सभा
१०९,- गट सम्मेलने
११०,- बिटस्तरीय क्रिडा व सांस्कृतिक महोत्सव
१११,- तालुकास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव
११२,- जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव
११३,- पंच तथा इतर समित्यात कार्य
११४,- नवरत्न स्पर्धा केंद्रस्तर ते जिल्हास्तरपर्यंत
११५,तंत्रस्नेही प्रशिक्षणे
११६,शालेय व्यवस्थापण समित्यांना प्रशिक्षण देणे.
* *मेळाव्यांचे आयोजन करणे*
११७,- पालक मेळाव्याचे आयोजन करणे.
११८,- महिला मेळाव्याचे आयोजन करणे.
११९,- बाल आनंद मेळाव्याचे आयोजन करणे.
१२०,- विद्यार्थ्यांसाठी सहलीचे आयोजन व नियोजन करणे.
१२१- सांस्कृतिक कार्यक्रमाचे , आयोजन करणे.
१२२,-राष्ट्रीय सण,वर्षभर सर्व महापुरुषांच्या जयंत्या पुण्यतिथ्या प्रभात फेर्या काढून साजर्या करणे.
हे सर्व करुन एका शिक्षकाला दोन दोन तीन तीन वर्गाचे अध्यापण करावे लागते.
*अध्यापण कार्य*
१२३,- वार्षिक मासिक नियोजन करणे.
१२४,- वेळापत्रक तयार करुन त्यानुसार अध्यापण करणे.
१२५,- नियमित दैनिक टाचन काढणे.
१२६,- लाॕगबुक मेंटन करणे.
१२७,- मुलांचा गृहपाठ तपासने.
१२८,- घटक चाचण्या घेणे.
१२९,- सत्र परिक्षा घेणे.
१३०,- पेपर्स तपासने.
१३१,- निकालपत्रक तयार करणे.
१३२,- दैनंदिन नोंदी घेणे.
१३३,- प्रत्येक विद्यार्थ्यांचे गुणपत्रक तयार करणे.
१३४,- निकाल जाहिर करणे.
१३५,- शाळेत वाचनालय चालवणे
१३६,- प्रयोगशाळा तयार करणे.
१३७,- वेगवेगळ्या विषयाचे कोपरे तयार करणे.
१३८,- घटकानुरुप शैक्षणिक साहित्ये तयार करणे.
१३९,- संगणक कक्ष तयार करुन विद्यार्थ्यांना संगणक प्रशिक्षण देणे. एवढंच नव्हे तर वेळोवेळी शासनाचे रोज येणारे सर्कुलर्स हा उपक्रम राबवा तो उपक्रम राबवा अहवाल सादर करा,ही लिंक भरा ती लिंक भरा ,आपत्ती निवारण शिक्षकाकडेच अबब....
एवढे करुनही आमच्यावर वाॕच ठेवणार्या यंत्रणेची लांब लचक यादी आहे.
१४०,-प्रत्येक पालक
१४१,-सर्व शालेय समित्या
१४२,-ग्रामपंचायत कमेटी
१४३,-केंद्र प्रमुख
१४४,-शिक्षण विस्तार अधिकारी
१४५,- गटशिक्षणाधिकारी
१४६,-शिक्षणाधिकारी
१४७,-मुख्य कार्यपालन अधिकारी
१४८,-शिक्षण उपायुक्त
१४९,-शिक्षण आयुक्त
१५०,-शिक्षण मंत्री......इ.
१५१,शेवटी वार्षिक शालेय तपासणी.
एवढं करुनही आम्ही फुकटचा पगार घेतो का? पगाराव्यतीरीक्त कसलाही अवैध मार्गाने एक रुपयासुद्धा न घेणारा या देशात प्रामाणिक एकमेव शिक्षकच आहे. मग त्याच्या पगाराचाच भाग असलेले चार दोन हजार घरभाडे आपल्याला का सलते? सरकारने मुख्यालयी क्वार्टर बांधुन देण्याची व्यवस्था करावी आम्ही घरभाड मागणार पण नाही. गांव खेड्यात राहणाऱ्या लोकांचीच घरात राहण्याची वाताहत आहे तेव्हा आम्हाला राहायला ते भाड्यने कुठून देणार?
आपण जे गुणवत्तेबाबत बोललात तेव्हा सांगावसं वाटते की गेल्या वीस वर्षापासून शिक्षक भरतीच केली नाही. बरेच शिक्षक दर महिण्याला निवृत्त होत आहे.शिक्षकाच्या हजारो जागा रिक्त आहे. एका एका शिक्षकाला चार चार वर्ग सांभाळावे लागत आहे. तेव्हा शिक्षकांच घरभाड बंद करण्यासाठी आवाज उठवण्यापेक्षा शिक्षक भरतीसाठी,जुण्या पेंशन योजनेसाठी आवाज उठवला असता तर समाजाचं भलं झालं असतं.
महोदय खरं तर आपण हा प्रश्न का उठवत नाही की पाच वर्ष विधायक झाला की कोट्यावधी माया त्याच्याकडे कशी जमा होते. आम्ही ५८ वर्ष सेवा करुन जुनी पेंशन नाही मग अशा कोट्याधिश विधायकाला पेंशनची का गरज? या आजी माजी विधायकांच्या संरक्षण, सोई सवलती तथा पेंशन मध्येचं या देशातल्या कष्टकऱ्यांच रक्त शोषल्या जात आहे यावर आपण आवाज का उठवत नाही?
----------------------
No comments:
Post a Comment