*आरोग्य धनसंपदा*
*किडनि स्टोन*
१) तुळस-तुळशीचा नियमित चहा घ्यावा. ओवा व तुळशिची पाने याचे चूर्ण सकाळी रिकाम्या पोटी घेतल्यास मूतखडा विरघळतो. त्वरित.
२) कुळिथ-रोज रात्री ४० ते ५० ग्रँम कुळिथ पाण्यात भिजवून ते सकाळी कुस्करून व गाळून २-३
महिने घेतल्यास मूतखडा विरघळून निघून जातो.
३) द्राक्षांच्या वाळलेल्या वेली आणून त्या जाळून त्याची राख मधातून घ्यावी. स्टोन लवकर विरघळतात.
४) काकडीचे मगज, ज्येष्ठमध व दारूहळदीचे चूर्ण तांदळाच्या धुवणासोबत घेतल्यास स्टोन विरघळून बाहेर पडतात.
५) हळद व एक वर्षापूर्विचा गूळ नियमित खाल्यास स्टोन तुटुन बाहेर पडतो.
६) कडुलिंबाच्या पानाची राख २ ग्रँम पाण्यासोबत नियमित खाल्यास मूतखडा विरघळतो.
७) जर खडा लहान असेल तर मेहंदीचे साल वाटून चूर्ण करावे व सकाळी अर्धा चमचा नियमित घेतल्यास मूतखडा विरघळतो.
८) पुनर्नवासव, चंद्रप्रभा वटी घ्यावी.
९) पाषाणभेद वनस्पती व गोखरू काटे यांचे समप्रमाणात मिसळलेले चूर्ण २ ग्रँम रोज एक वेळ सकाळी रिकाम्या पोटी पाण्यासोबत द्यावे.
त्यानंतर ४-५ तास तोंडाने काही खाउ पिऊ नये. ..
....ज्यांना त्रास असेल त्यांनी जरूर हे करुन पहावे.
अर्थात वैद्यकीय सल्ला अधिक महत्त्वाचा.
*निरोगी सुप्रभात.....*
No comments:
Post a Comment