Thursday, 18 June 2020

अभ्यासमाला-३७

अभ्यासमाला-३७

दि. २० मे २०२०  वार- बुधवार

शाळा बंद..पण शिक्षण आहे (अभ्यासमाला-३७)

नमस्कार विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो!
     घरीच राहून आपण सर्वांची काळजी घेताय ना? कोव्हिड-१९ या साथीच्या काळात आपण सर्वजण घरी सुरक्षित राहून कोरोना विषाणूला पळवून लावू याची मला खात्री आहे.
    महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री मा.ना.वर्षा गायकवाड यांच्या प्रेरणेने  राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे मार्फत आपण सुरू केली आहे विविध शैक्षणिक व सहशालेय उपक्रमांची मालिका! यातील उपक्रम १ ली ते १० वीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांनी कृती करून पहावेत आणि आनंद घ्यावा.
      आपण या अभ्यासमालेत कोरोना योद्धा ही एक  लिंक देत आहोत. या  लिंकवर आपल्याला इंग्रजी, हिंदी व मराठी भाषेमध्ये आपल्या नावाचे पुस्तक तयार करून डाऊनलोड करता येईल व वाचता येईल.
     त्याचबरोबर इयत्ता 5 वी व 8 वी शिष्यवृत्ती, 10 वी अभ्यासमाला आणि अवांतर वाचनासाठी एक पी.डी.एफ. पुस्तकही दररोज पुरवण्यात येत आहे. गोष्टीच्या पुस्तकाबरोबरच आम्ही प्रथम संस्थेच्या मदतीने मिस कॉल द्या आणि गोष्ट ऐका ही सुविधा उपलब्ध करून देत आहोत. त्यासाठी आपल्याला दिलेल्या मोबाईल क्रमांकावर एक मिस कॉल द्यावा लागणार आहे. त्यानंतर आपल्याला एक फोन येईल फोनवरील सूचना ऐका आणि गोष्टींचा आनंद घ्या.
    
     सध्या लॉकडाऊन (बंद)च्या काळात आपला अभ्यास थांबू नये यासाठी आम्ही  दररोज आपल्यासाठी घेऊन येत आहोत ऑनलाईन अभ्यास व विविध उपक्रम! 

त्यासाठी आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये दीक्षा ऍप डाऊनलोड करावे लागेल. त्यासाठी खालील लिंकला टच करा.


कोरोना योद्धा


मिस कॉल द्या आणि गोष्ट ऐका
खालील मोबाईल क्रमांकावर मिस कॉल द्या
.
08033094243

आता कचरा नाही
वास्तविक जीवनातील समस्यांसाठी आपण काय करू शकतो?


अवांतर वाचन
आजच्या पुस्तकाचे नाव : चहा


चित्रकला
बकेट आणि ठोकळा रंगकाम


स्पोकन इंग्लिश
English speaking practice


संगणक विज्ञान
स्लाईडमध्ये अक्षरांचा समावेश
https://bit.ly/3cKzKE3

संगीत/नाटक
गायन 
गीत, गीताची परिभाषा व प्रकार


मजेत शिकूया विज्ञान
कॉइन मोटार


इयत्ता १०वी अभ्यासमाला
विषय - गणित भाग १
पाठ - वर्तुळावर स्पर्शिकांची रचना भाग १


शिष्यवृत्ती परीक्षा तयारी
इयत्ता - ५ वी
विषय - बुद्धिमत्ता चाचणी
घटक - अंक कोडी भाग १


इयत्ता - ८ वी
विषय - बुद्धिमत्ता चाचणी
घटक - अंक कोडी


Stay home, stay safe!

आपला
दिनकर पाटील,
संचालक
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे

No comments:

Post a Comment