Tuesday 5 March 2024

अहिराणी भाषेतील वाक्यप्रचार व म्हणी

आपल्या अहिराणी भाषेचा ह्रास होत चालला असून ती लोप पावेल ह्या उद्देशाने अहिराणी वसा जतन करण्याच्या हेतूने हे पेज तयार केले असून आपणास आनंदाने publish करीत आहे तरी आपणास माहीत असलेल्या काही म्हणी वाक्यप्रचार नक्कीच कमेंट्स बॉक्स मध्ये कमेंट्स करून सांगा👇

 अहिराणी भाषेतील वाक्यप्रचार व म्हणी

"दात कोरीसन पोट नही भरस."

"घोडा इकिसन डांगर खाऊ नई"

"नक्टी ना लगिनमा सतरा इगने"

"करणं येस, त्यामा रडनं येस"

आपणास माहीत असलेल्या काही म्हणी वाक्यप्रचार नक्कीच कमेंट्स बॉक्स मध्ये कमेंट्स करून सांगा👇

Friday 16 June 2023

DROPBOX मध्ये असलेल्या विद्यार्थ्याला आपल्या शाळेत कसे परत घ्यावे

 DROPBOX मध्ये असलेल्या विद्यार्थ्याला आपल्या शाळेत कसे परत घ्यावे हे जाणून घेण्यासाठी खालील TEXT वर क्लिक करा.

Dropbox student return to school

Thursday 13 April 2023

पॅन कार्ड आणि आधार लिंक

आयकर विभागाच्या म्हणण्यानुसार, पॅन कार्ड आणि आधार लिंक करण्यासाठी ३१ मार्चपर्यंतची मुदत देण्यात आली होती, मात्र आता सरकारने ही अंतिम तारीख ३० जूनपर्यंत वाढवली आहे. आयकर विभागाच्या माहितीनुसार, जर तुम्ही तुमचे पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक केले नाही तर तुमच्या पॅन कार्डशी संबंधित सर्व सेवा बंद होतील.

केंद्रीय वित्त मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, पॅन कार्ड आणि आधार लिंक करणे सर्वांसाठी अनिवार्य आहे परंतु विशिष्ट समुदायाच्या लोकांसाठी, पॅन कार्ड आणि आधार लिंक करणे विनामूल्य आहे, जसे की मेघालय, जम्मू आणि काश्मीरमध्ये राहणारे लोक आणि अंतर्गत आयकर कायदा 1961. अनिवासी आणि 80 वर्षांवरील व्यक्ती आणि जे भारताचे नागरिक नाहीत. या सर्वांसाठी पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करणे पूर्णपणे विनामूल्य आहे.

पण जर तुम्ही वर दिलेल्या यादीत आला नाही तर तुम्हाला पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करण्यासाठी 1,000 रुपये शुल्क भरावे लागेल.

पॅन कार्ड आणि आधार लिंक करण्याची प्रक्रिया खूप सोपी आणि मजेदार आहे, फक्त खालील लिंकवर टिचकी मारून पॅन आणि आधार नंबर टाका आणि लिंक करा.जर तुम्ही मेघालय, जम्मू आणि काश्मीरचे रहिवासी असाल किंवा पॅन आणि आधारमध्ये दिलेल्या माहितीनुसार अनिवासी असाल किंवा तुमचे वय 80 वर्षांहून अधिक असेल, तर ही प्रक्रिया तुमच्यासाठी विनामूल्य असेल आणि त्यांच्यासाठी ते आवश्यकही नाही. लोकांना पॅन आधार लिंक करण्यासाठी. खालील लिंकवर टिचकी मारा 

Link Adhhar with pan 

Friday 23 December 2022

हळदीचा उपयोग

 *आरोग्य धनसंपदा*


  *हळदीच्या सेवनाने झपाट्याने कमी होईल खराब कोलेस्ट्रॉल?

----------------------------------------


      प्राचीन काळापासून हळदीचा वापर आरोग्यासाठी केला जातो. कोलेस्ट्रॉलच्या समस्येवरही हळद उपयुक्त ठरू शकते. फक्त वापरण्याची पद्धत एकदा जाणून घ्या

     हळद आपल्याला प्रत्येक घरामध्ये पाहायला मिळते. हळदीचा वापर सामान्यतः घरांमध्ये जेवण चवदार बनवण्यासाठी केला जातो. त्वचेचे सौंदर्य वाढवण्यापासून ते रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी हळद खूप फायदेशीर आहे. हळदीचा वापर प्राचीन काळापासून संसर्ग, जखम आणि पोटाच्या समस्यांसाठी केला जातो. हळद हा अनेक पोषक तत्वांनी समृद्ध आहे जी कर्करोग आणि मधुमेह यांसारख्या रोगांवर उपचार करण्यास मदत करते. हळदीचे आरोग्यदायी फायदे बाजारात सहज उपलब्ध आहेत आणि ती विविध प्रकारे वापरली जाऊ शकते. हळद रक्तातील कोलेस्टेरॉल नियंत्रित ठेवून हृदय निरोगी ठेवण्यास देखील मदत करू शकते. चला जाणून घेऊया हळदीचे सेवन कोलेस्टेरॉल नियंत्रित करण्यासाठी कसे उपयुक्त ठरते?


 *हृदयविकारात फायदेशीर*  शरीरात उच्च कोलेस्ट्रॉल म्हणजे तुम्हाला हृदयविकाराच्या झटक्यापासून स्ट्रोकपर्यंत कोणत्याही गोष्टीचा धोका असू शकतो. अशा परिस्थितीत हळदीसोबत कोलेस्टेरॉलची पातळी राखण्यासाठी वेळोवेळी अनेक अभ्यास आणि संशोधन केले गेले आहेत. प्राणी आणि मानवांवर केलेल्या संशोधनानुसार हळदीचे सेवन केल्याने रक्तातील कोलेस्टेरॉलच्या पातळीवर तीन प्रकारे परिणाम होतो.


 *1) LDL कोलेस्टेरॉलची पातळी कमी करणे...* 

लो-डेन्सिटी लिपोप्रोटीन म्हणजेच LDL कोलेस्टेरॉलला वाईट कोलेस्ट्रॉल म्हणतात आणि त्यामुळे हृदयाच्या गंभीर समस्या उद्भवू शकतात. हळदीचे सेवन केल्याने एलडीएल कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते आणि शरीरातील चांगल्या कोलेस्ट्रॉलची पातळी वाढते, ज्यामुळे आरोग्य सुधारण्यास मदत होते.


 *2) ऑक्सिडेशनपासून एलडीएल कोलेस्टेरॉलचे संरक्षण*

 एथेरोस्क्लेरोसिस तेव्हा होतो जेव्हा एलडीएल कोलेस्टेरॉल ऑक्सिजनसह प्रतिक्रिया देते, ज्यामुळे रक्ताभिसरणात अडथळा येऊ शकतो. हळदीचे सेवन केल्याने हे ऑक्सिडेशन थांबते, त्यामुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहते आणि रक्तवाहिन्याही निरोगी राहतात.


 *3) ट्रायग्लिसराइड पातळी कमी करणे* 

उच्च रक्तातील कोलेस्टेरॉलसह उच्च ट्रायग्लिसराइड पातळी हृदयाच्या आरोग्यास धोका निर्माण करू शकते. ट्रायग्लिसराइड देखील धमन्यांमध्ये तयार होते, ज्यामुळे LDL कोलेस्टेरॉल रक्ताभिसरण समस्या निर्माण करणे सोपे होते. हळदीच्या वापराने ट्रायग्लिसराइडचे प्रमाण नियंत्रित करता येते.


     हळदीमध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात. खराब कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रोज भाज्यांमध्ये हळदीचा वापर करावा. तसेच रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास दुधात चिमूटभर हळद टाकून प्यावे. याशिवाय रोज एक कप ग्रीन टी प्यायल्याने उच्च कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होण्यास मदत होते.


*(कॉपी पेस्ट)*


*निरोगी सुप्रभात.*

लिंबुच्या पानाचे फायदे

 *आरोग्य धनसंपदा*


*लिंबुच्या पानांचे आहेत एवढे विलक्षण फायदे की तुम्ही कधी विचार सुद्धा केला नसणार; पृथ्वीवर जणू हा रामबाणच.....!*


खरतर लिंबाच्या पानांचा आपण वर्षभर उपयोग करू शकतो व त्याचा फायदा घेऊ शकतो. आजच्या आमच्या या माहितीद्वारे आम्ही तुम्हाला या पानांचे खास फायदे सांगणार आहोत जे खूपच औषधी आहेत. हजारो वर्षांपासून याचा प्रयोग केला जात आहे. अनेक आजारांना याच्या मदतीने आपण दूर ठेवू शकतो. आयुर्वेदात याचे खूपच महत्व आहे. 


आज आपण लिंबाच्या पानांचे फायदे बघूया. तुमच्या जवळपास ही पाने मिळू शकतात. तुम्ही याचा प्रयोग करू शकतात. आयुर्वेदात माहिती महत्वाची आहे, योग्य प्रमाण खूप महत्वाचे आहे. तरच त्याचा फायदा मिळतो. याच्याबद्दल विस्ताराने जाणून घेऊ या. 


◼️महत्त्वाचे म्हणजे लिंबाचे पान जर हातात घेऊन ते चुरुन किंवा रगडून त्याचा वास घेतला, तर डोकेदुखीमध्ये आराम पडतो. कोणाला डोकेदुखी, अर्धशिशी, मायग्रेन असेल तर लिंबाच्या पानाचा प्रयोग करून तुम्ही ठीक होऊ शकता. याची पाने हातात रगडून ५ मिनिटे श्वास घ्या, तुम्हाला आराम मिळेल.


◼️ही पाने तुमच्या चेहर्‍यावरील डाग, खड्डे, मुरूमे दूर करण्यासाठी फायदेमंद आहेत. ही खूपच दिव्य अशी औषधी आहे. याची पाने घ्या, छोटी ५ ते ६ पाने घ्या, ती वाटून घ्या व त्यात मध मिसळून चेहर्‍यावर लावा. दिवसातून एकदा हा प्रयोग करून बघा, चेहर्‍यावरील सुरकुत्या, डाग, मुरूमे दूर होतील व चेहरा चमकदार होईल.


◼️लिंबाच्या पानांचे खूप फायदे आहेत.कोणाला त्वचारोग असेल, खाज, खरूज, नायटा, फोड असेल, तर ते दूर करण्यासाठी लिंबाची पाने खूपच उत्तम असे औषध आहे. त्या साठी एक साधा प्रयोग करून बघा. पाने वाटून त्याची पेस्ट बनवा, त्यात थोडा कापुर व कडुनिंबाचे तेल मिसळा. एक चिमुट हळद घाला. सगळे व्यवस्थित मिसळा व जिथे तुम्हाला खाज, खरूज, नायटा असेल त्याजागी ही पेस्ट लावा. कोणत्याही प्रकारच्या त्वचारोगात ह्याचा लेप खूपच फायदेशीर आहे. त्वचारोग नाहीसा होतो, खूपच दिव्य औषध आहे हे.


◼️केसांमधील कोंडा नाहीसा करण्यासाठी पण याचा उपयोग होतो. पाने वाटून पेस्ट बनवून केसांच्या मुळाशी लावून हलक्या हाताने मालीश करा. १ ते २ वेळा लावल्यामुळे केसातील कोंडा नाहीसा होतो.


पोटात जंत झाले असतील, साधारण लहान मुलांच्या बाबतीत जर पोटात जंत झाले, तर लिंबाच्या पानांचा ५ मिली रस घेऊन त्यात हलका मध घालून मुलाला पाजा, त्याच्या पोटातील जंत मरतील या रसाने. मोठ्या माणसासाठी १० मिली रस जरूरी आहे.


◼️कावीळ झाली असेल, तर त्यासाठी पानांचा १० मिली रस काढून तो ताकात मिसळून त्याचे सेवन करा. १० ते १२ दिवस हे घेतले तर कावीळ ठीक होते. हा काविळीसाठी रामबाण उपाय आहे.


◼️पोटातील कोणत्याही समस्येवर म्हणजेच गॅस, पोटदुखी, बद्धकोष्टता यावर हा उपाय प्रभावी आहे.


खरंतर सर्वांन माहीत आहे लिंबू खाण्याचे किती फायदे आहेत त्याचप्रमाणे याची पाने सुद्धा खूपच फायदेशीर आहेत. याच्या पानांचा काढा रक्त शुद्ध करतो. पाने घालून चहा बनवून घेऊ शकता.


*(काॅपीपेस्ट)*


*निरोगी सुप्रभात.*

Wednesday 21 December 2022

लघवीच्या तपासणीने काय समजते ?

 *आरोग्य धनसंपदा*


  लघवीच्या तपासणीने काय समजते ?

तुम्ही डॉक्टरांकडे गेल्यानंतर डॉक्टर तुम्हाला तक्रारी विचारतात. तुमची तपासणी करतात. बऱ्याचदा तुम्हाला पॅथाॅलॉजी लॅबमध्ये जाऊन लघवीचे तपासणी करायला सांगतात. लघवीच्या तपासणीतून डॉक्टरांना काय समजते, ते आता समजावून घेऊ.

मूत्रपिंडामध्ये सतत रक्त गाळले जात असते. या प्रक्रियेत रक्तातील विषारी, टाकाऊ पदार्थ, अतिरिक्त पाणी आणि क्षार रक्तातून बाहेर काढले जातात. याचाच परिणाम म्हणून लघवी तयार होते. शरीरात चालणार्‍या चयापचयामुळे लघवीतील घटकही बदलत असतात. आता सामान्यपणे लघवीच्या ज्या तपासण्या केल्या जातात त्यामुळे काय समजते ते पाहू.

लघवीमध्ये सामान्यतः ग्लुकोज असायला नको. लघवीत जर ग्लूकोज असेल तर रुग्णाला मधुमेह असण्याची शक्यता असते. लघवीत अल्बुमिन हे प्रथीन जास्त प्रमाणात असले तर रुग्णाला मूत्रपिंडाचा विकार, गरोदरपणातील उच्च रक्तदाब इत्यादी रोग असण्याची शक्यता असते. 

लघवीत पित्ताचे क्षार किंवा बिलीरुबीन, युरोबिलीनोजेन आदी पदार्थ असतील तर कावीळ असण्याची शक्यता असते. लघवी मध्ये स्फटिक असतील तर अशा रुग्णांमध्ये क्षारांच्या चयापचयात दोष असू शकतो. लघवीत काही संप्रेरके आढळून आल्यास विशिष्ट रोगांचे निदान होऊ शकते. गरोदरपणाची खात्री अशाच प्रकारच्या एका तपासणीमुळे करता येते. 

लघवीत पू येत असेल तर मूत्रमार्गात काही जंतुसंसर्ग असू शकतो. लघवीत रक्त वा रक्तातील लाल रक्तपेशी येत असतील; तर मुतखडा, मुत्रपिंडाचा क्षयरोग किंवा मूत्रमार्गातील जखम यांसारखे रोग असू शकतात. लघवीमध्ये काही जंतू असले किंवा पू मधील पेशी असल्या, तर मूत्रमार्गाच्या जंतुसंसर्गाचे निदान होऊ शकते.

याखेरीज लघवीचे प्रमाण, लघवी करताना वेदना होणे, लघवी करताना जळजळ होणे, लघवी वारंवार होणे, लघवी न होणे; या सर्वांमुळेही काही रोगांचे निदान होऊ शकते. यावरुन तुमच्या लक्षात येईलच की, लघवी तपासल्याने अनेक गोष्टी कळु शकतात. त्यामुळे कंटाळा न करता लघवीची तपासणी करायला हवी.


डॉ. जगन्नाथ दीक्षित

डाॅ. अंजली दीक्षित

यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातून

मनोविकास प्रकाशन




Monday 19 December 2022

जोतीराव गोविंदराव फुले

 जोतीराव गोविंदराव फुले


जोतिबा फुले यांचे मूळ गाव सातारा जिल्ह्यातील

कटगुण हे होते. त्याच गावी महात्मा फुल्यांचा

जन्म ११ एप्रिल १८२७ रोजी झाला. जोतिबांच्या

वडिलांचे नाव गोविंदराव आणि आईचे नाव चिमणाबाई होते.

वडिलांचा फुले विक्रीचा व्यवसाय होता. त्यामुळे

गोर्हे हे त्यांचे मूळ आडनाव असले तरी, पुढे ते फुले म्हणून ओळखले जाऊ लागले व तेच नाव पुढे रूढ

झाले. कटगुणहून त्यांचा परिवार पुरंदर

तालुक्यातील खानवडी येथे आला.तेथे त्यांचे घर असून, त्यांच्या नावे सातबाराचा उतारा आहे.

प्राथमिक शिक्षणानंतर काही काळ त्यांनी भाजी विक्रीचाव्यवसाय केला. १८४२ ला माध्यमिक

शिक्षणासाठी पुण्याच्या स्कॉटिश मिशन

हायस्कूलमध्ये त्यांनी प्रवेश घेतला.

बुद्धी अतिशय तल्लख त्यामुळे पाच-सहा

वर्षातच त्यांनी अभ्यासक्रम पूर्ण केला.सामाजिक कार्य

सप्टेंबर २३, इ.स. १८७३ रोजी महात्मा फुलेयांनी *सत्यशोधक समाजाची* स्थापना

केली. तथाकथित उच्चवर्णीयांकडून

होणार्या अन्यायापासून, अत्याचारापासून व

गुलामगिरीतून शूद्रातिशूद्र समाजाची

मुक्तता करणे व त्यांना हक्काचीजाणीव करून देणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय

होते.

 'सर्वसाक्षी जगत्पती ।

त्यालानकोच मध्यस्ती॥' 

हे या समाजाचे

घोषवाक्य होते. सत्यशोधक समाजाने

गुलामगिरीविरुद्ध आवाज उठविला आणि सामाजिकन्यायाची व सामाजिक पुनर्रचनेची

मागणी केली. 

समाजातील विषमता नष्ट करणे व

तळागाळातील समाजापर्यंत शिक्षण पोहचवणे हेसत्यशोधक समाजाचे ध्येय होते. महात्मा फुल्यांच्या

कवितेच्या शिक्षणाचे महत्त्व पटवून देणार्या

खालील ओळी प्रसिद्ध आहेत. -


“ विद्येविना मतीगेली।

 मतीविनानीतीगेली।

नीतीविनागती गेली।

गतीविना वित्त गेले।

वित्ताविना शूद्र खचले। इतके अनर्थ

एका अविद्येने केले।। ”


जोतीरावांनी त्यांच्या पत्नी

सावित्रीबाईंना शिक्षण देऊन शिक्षणकार्यास

प्रवृत्त केले. शाळेच्या मुख्याध्यापकपदी आरूढझालेली भारतातील पहिली

महिला म्हणजे सावित्रीबाई.त्याचप्रमाणे

स्वतंत्रपणे फक्त स्त्रियांसाठी शाळा काढणारेमहात्मा फुले पहिले भारतीय होत.

वाचनाची अतिशय आवड असल्यामुळे

शिवाजी महाराजांचे चरित्र व थॉमस पेन या

विचारवंताच्या ‘राईट्स ऑफ मॅन’ या ग्रंथाचा त्यांच्यावर विशेष

प्रभाव पडला. बहुजन समाजाचे अज्ञान, दारिद्र्यआणिसमाजातील जातिभेद पाहून ते अतिशय अस्वस्थ

होत असत. ही सामाजिक परिस्थिती

सुधारण्याचा त्यांनी निश्चय केला. त्याप्रमाणे

आपल्या पत्नी सावित्रीबाईंना १८४८

साली पुण्यामध्ये बुधवार पेठेतीलभिडे यांच्या वाड्यात पहिली

मुलींची शाळा काढून

तेथीलशिक्षिकेचीजबाबदारी सावित्रीबाईंवर

सोपविली. महाराष्ट्रातील

स्त्री शिक्षणाची ही

मुहूर्तमेढ ठरली. तसेच अस्पृश्यमुलांसाठी त्यांनी पुण्याच्या वेताळपेठेत

१८५२ मध्ये शाळा स्थापन केली. त्यांच्या याकार्यालासनातन्यांकडून सतत विरोध होत असे. पणजोतीराव आपल्या भूमिकेवर ठाम असत. समाज

सुधारण्याच्या कार्याला गती देण्यासाठी

व व्यापक करण्यासाठी १८७३ साली

त्यांनी ‘सत्यशोधक समाजा’ची

स्थापना केली. ‘कोणताही धर्म

ईश्वराने निर्माण केलेला नाही आणि चातुर्वण्य व

जातिभेद ही निर्मिती

मानवाचीच आहे’ असे रोखठोकपणे बोलताना मात्रया विश्वाची निर्मिती

करणारी कोणती तरी

शक्ती आहे अशी

त्यांचीविचारसरणी होती. मानवाने

गुण्यागोविंदाने रहावे असे त्यांचे मत होते. त्यांनीलिहिलेल्या ‘शेतकर्याचा असूड’ 

या पुस्तकातून

महाराष्ट्रातील शेतकर्यांची विदारक

दुर्दशा आणि दारिद्र्याची वास्तवता विशदकेली आहे. या पुस्तकाद्वारे विशाल दृष्टिकोनाचा

क्रांतिकारक म्हणून ही जोतीरावांचे

दर्शन होते.

 ‘नीती हाच

मानवी जीवनाचा आधार आहे’

 हाविचार मांडणारे जोतीराव एक तत्त्वचितक

व्यत्तिमत्त्व म्हणूनही आपल्यासमोर येतातसाहित्य आणि लेखन

' सार्वजनिक सत्यधर्म ' हा सत्यशोधक समाजाचा प्रमाण

ग्रंथ मानला जातो. या समाजाचे मुखपत्रम्हणून

' दीनबंधू' हे साप्ताहिक चालविले जात असे.

तुकारामाच्या अभंगांचा त्यांचा गाढा अभ्यास होता. अभंगांच्या

धर्तीवर त्यांनी अनेक 'अखंड'रचले. त्यांना सामाजिक विषमतेचे जागतिक भान होते. आपला'गुलामगिरी' ग्रंथ अमेरिकेतील

कृष्णवर्णीयांना त्यांनी समर्पित

केला. 'अस्पृश्यांची कैफियत' हा महात्मा फुलेंचाअप्रकाशित ग्रंथ आहे. सार्वजनिक सत्यधर्म हा त्यांचा

ग्रंथ त्यांच्या मृत्यूनंतर इ.स. १८९१ मध्ये प्रकाशितझाला.सन्माननीयउपाधी

जोतिबा फुले यांच्या सामाजिक कार्याची दखलघेऊन लोकांनी त्याना ‘महात्मा’ ही

उपाधी दिली. त्यामुळे ज्योतिबा फुले

हे महात्मा फुले या नावाने ओळखले जाऊ लागले.

इ.स. १८४८  भारतातील

मुलींची पहिली शाळा सुरूकेली. बहुजन समाजाच्या

शिक्षणासाठी काम सुरू केले.सप्टेंबर ७, इ.स. १८५१  भिडे वाड्यात व रास्ता पेठेत

मुलींच्या शाळेची सुरुवात.

इ.स. १८५२  पूना लायब्ररीची

स्थापना.

मार्च १५, इ.स. १८५२ वेताळपेठेत

अस्पृश्यांसाठी पहिली शाळा सुरू

केली.

नोहेंबर १६, इ.स. १८५२ - मेजर कॅन्डी

यांच्याकडून शैक्षणिक कार्यासाठी ब्रिटिश

सरकारतर्फे विश्रामबाग वाड्यातसत्कारकरण्यात आला.

२८ नोव्हेंबर, इ.स. १८९० - पुणे येथे निधन झाले.

विद्याध्यायानासाठी ज्यांचा सतत असे प्रयास,

त्यांचे अखंड जीवन म्हणजे, जणू एक खडतर

प्रवास.

परि स्त्री शिक्षण; हा एकची असे

ध्यास, हा एकची असे ध्यास,

या उक्तीप्रमाणे महात्मा ज्योतीराव

फुले यांनी आपले व्यक्तिमत्व स्वयंप्रेरणेने व

स्वतःच्या प्रयत्नांनी घडविले होते. त्यांचा पिंड हा

कृतीशील क्रांतिकारकाचा होता.

महाराष्ट्राच्या समाजसेवेसाठी ध्येयाने भरून

जाऊन आपले सर्व जीवन समर्पित करणारे ते

थोर पुरुष होते. आधुनिक भारतातले पहिले समाजक्रांतिकारक

म्हणून त्यांना ओळखले जाते. कारण ते

सामान्यांतील असले तरी विचाराने व

कर्तृत्वाने असामान्य होते. सामाजिक विषमतेविरुद्ध

ज्योतीबांनी बंड पुकारले. 'शिक्षण व

समता' या दोन शब्दातच त्यांच्या या कार्याचे यथोचित वर्णन

करता येईल. महाराष्ट्रातील सर्वसामान्यांसाठी रात्रंदिवस झटणारे ते सेवक होते.