*आरोग्य धनसंपदा*
*मेहंदी चे आयुर्वेदिक गुणधर्म*
1) *डोकेदुखी व पित्त* –
गरमी किंवा पित्ताने डोके दुखत असल्यास 25 ग्रॅम मेहंदीची पाने 50 ग्रॅम तिळाच्या तेलात उकळून हे तेल डोक्याला लावावे किंवा 10 ग्रॅम मेहंदीची फुले 100 ग्रॅम पाण्यात उकळून ते पाणी पिण्याने लाभ होतो.
2) *तोंड आल्यावर* –
10 ग्रॅम मेहंदीची पाने , 200 ग्रॅम पाण्यात उकळून त्या पाण्याने गुळण्या कराव्या.
3) *केस रंगविण्यासाठी* –
मेहंदीची पावडर, लिंबाचा रस, आवळा पूड, चहाचे पाणी हे सर्व रात्रभर लोखंडी भांड्यात भिजवून, सकाळी केसांना लावावे व 2 - 3 तासांनंतर कोमट पाण्याने धुवावे. केस नैसर्गिकरित्या रंगतात सतेज व मुलायम होतात.
4) *अत्तरासाठी*-
मेहंदीच्या फुलापासून अत्तर तयार होते.याला हीना असे म्हणतात.
5) *घश्याला सूज व तोंड आल्यास* –
मेहंदीच्या पानांच्या काढयाने गुळण्या कराव्या.
6) *आवेवर* –
मेहंदीच्या बिया पाण्यात उकळून ते पाणी पिण्यास द्यावे.
7) *हात व पाय सजविण्यासाठी*-
पूर्वी काही विशिष्ठ समाजात किंवा प्रांतात उदा. राजस्थान, गुजराथ इ. लग्नसमारंभात किंवा धार्मिक कार्यात स्रियांनी, विशेषत: नववधुनी मेहंदीने हात सजविण्याची रीत होती. पण आजकाल मात्र संपूर्ण भारतभर शुभकार्यात मेहंदी काढण्याची प्रथा फार प्रचलित झाली असून,मेहंदीचा कार्यक्रम हा एक वेगळा कार्यक्रम प्रत्येक लग्नकार्यात अगदी आवर्जून असतो. अत्यंत कलाकुसरीने सुंदर नक्षीदार नक्षीने नववधू व इतरांचे हात व पाय रंगलेले दिसतात.
*निरोगी सुप्रभात....*
No comments:
Post a Comment