Friday 4 June 2021

शिक्षण विभाग, पंचायत समिती एरंडोल स्मरणिका

     शिक्षण विभाग, पंचायत समिती एरंडोल 
     स्मरणिका 
 १) शैक्षणिक व गुणवत्ता वाढीसाठी राबविलेले उपक्रम 
 २) विशेष उपक्रम : Tele Conferencing
    ३) Covid साठी शिक्षकांनी केलेली आर्थिक मदत 
 ४) Covid-19 नियंत्रणासाठी शिक्षकांची सहभागिता 
 ५) भौतिक सुविधांमध्ये केलेली प्रगती व लोकसहभागातून शाळाखोली - सन 2020-21
        Full news scroll up wait a minute
         शिक्षण विभाग, पंचायत समिती एरंडोल
                          स्मरणिका

         १) शैक्षणिक व गुणवत्ता वाढीसाठी
                    राबविलेले उपक्रम
        २) विशेष उपक्रम : Tele Conferencing
     ३) Covid साठी शिक्षकांनी केलेली आर्थिक मदत
    ४) Covid-19 नियंत्रणासाठी शिक्षकांची सहभागिता
           ५) भौतिक सुविधांमध्ये केलेली प्रगती व
         लोकसहभागातून शाळाखोली - सन 2020-21


स्वाध्याय उपक्रम यशोगाथा ता. एरंडोल जि. जळगाव

कोरोना कालावधीत शाळा बंद पण शिक्षण सुरु यासाठी स्वाध्याय उपक्रमाची महत्वाची भूमिका आहे. ३ नोव्हेंबर २०२० रोजी मा. वर्षाताई गायकवाड शिक्षणमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते या उपक्रमाची सुरुवात झाली.

राज्यातील पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसोबत संवाद साधण्यासाठी व्हॉट्स अॅपच्या माध्यमातून 'स्वाध्याय' (डिजिटल होम असेसमेंट योजना) उपक्रमाचा शुभारंभ मंगळवारी करण्यात आला होता. या माध्यमातून पहिली ते दहावीपर्यंतच्या सर्व इयत्तांमधील विद्यार्थ्यांकडे उपलब्ध असणाऱ्या मोबाइलवर 'क्विझ' (प्रश्नमंजूषा) पाठवण्यात आल्या तर त्याच्या उपयोगातून शिक्षक, विद्यार्थी आणि पालक विद्यार्थ्यांच्या सद्यस्थितीबद्दल नियमित माहिती घेतली. करोनामुळे शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी आणि त्यांच्या बुद्धिमत्तेला चालना देण्यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला होता. एका स्मार्ट फोनद्वारे १०० विद्यार्थी व्यग्र राहीले. ज्या विद्यार्थ्यांकडे म्हणजेच त्यांच्या पालकांकडे 'स्मार्ट फोन' नाहीत, तेही या उपक्रमात सहभागी झाले. हा 'स्वाध्याय'चा सर्वांत मोठा फायदा आहे. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (एससीईआरटी) व लीडरशिप फॉर इक्विटी यांच्या वतीने स्वाध्याय उपक्रम सुरू केला गेला. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी मंगळवारी ३ नोव्हेंबर २०२० उपक्रमाचे उद्घाटन करून, प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत शालेय शिक्षण विभागाचे कार्यक्रम व उपक्रम पोहोचवण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन अधिकाऱ्यांना केले होते. अतिरिक्त मुख्य सचिव वंदना कृष्णा, शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी, 'एससीईआरटी'चे संचालक डॉ. दिनकर पाटील, विकास गरड आदी उपस्थित होते. या उपक्रमाच्या माध्यमातून राज्यातील विद्यार्थ्यांची पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान वाढविण्यावर भर देण्यात आला. प्रारंभी, मराठी आणि सेमी-इंग्रजी माध्यमासाठी मराठी आणि गणिताचे विषय सुरू झाले होते, काही दिवसांत उर्दू माध्यमही सुरू केले गेले होते. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात नमूद केलेल्या पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान वाढीसाठी स्वाध्याय हा उपक्रम फायद्याचा ठरत आहे.

स्वाध्याय उपक्रमात एरंडोल तालुक्यात एकूण १५० शाळा असून जास्तीत जास्त शिक्षक विद्यार्थी व पालकांपर्यंत हा उपक्रम पोहोचविण्यासाठी तालुकास्तरावर गट शिक्षणाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, विषय साधन व्यक्ती समावेशित शिक्षण तज्ञ, विशेष शिक्षक यांना शाळानिहाय भेटीचे नियोजन करून शिक्षक, विद्यार्थी व पालक यांनी स्वाध्याय उपक्रमात रजिस्ट्रेशन कसे करावे याबाबत प्रशिक्षण दिले. प्रत्येक विद्यार्थी या उपक्रमात सहभागी होण्यासाठी प्रयत्न केले.

प्रत्येक अधिकारी व कर्मचारी यांनी कमीतकमी १०० विद्यार्थी या उपक्रमात सहभागी होतील याचे नियोजन गटशिक्षणाधिकारी यांनी केले. गट साधन केंद्रातील साधन व्यक्ती, समावेशित साधन व्यक्ती, व विशेष शिक्षक यांच्या शाळा भेटी नियोजनामुळे एरंडोल तालुक्याचा सहभाग या उपक्रमात वाढता राहिला. त्यामुळे सतत जिल्ह्यात प्रथम तीन क्रमांकात एरंडोल तालुका स्थान मिळवून होता.



स्वाध्याय सोडवुन घेताना गटशिक्षणाधिकारी पं.स.एरंडोल व कर्मचारी



नवोपक्रम स्मरणिका संख्यात्मक माहिती
१)  WhatsApp स्वाध्याय उपक्रम


२) विशेष उपक्रम :- Tele Conferencing

१) दिक्षा app  :- एरंडोल तालुक्यात दिक्षा app या विशेष उपक्रमांतर्गत १५४७ विद्यार्थ्यांनी वापर केला तर ४८२ शिक्षकांनी विद्यार्थ्यांना वापर करण्या संदर्भात प्रोत्साहित केले.

(२) टिली मिली प्रोग्राम:- एरंडोल तालुक्यात टिली मिली प्रोग्राम या विशेष उपक्रमांतर्गत

२९८२ विद्यार्थ्यांनी सह्याद्री संच दूरदर्शन च्या माध्यमातून शिक्षण घेतले. तर ४२३ शिक्षकांनी विद्यार्थ्यांना वापर करण्या संदर्भात प्रोत्साहित केले.

३) ऑनलाईन : एरंडोल तालुक्यात ऑनलाईन शिक्षण उपक्रमांतर्गत ३७८६ विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतले. तर ४२३ शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे whats app groups तयार करून शिक्षण दिले.

४) यु ट्यूब चा वापर : एरंडोल तालुक्यात विद्यार्थ्यांना प्रभावी शिक्षण देण्यासाठी अध्ययनात
Youट्यूब चा वापर करण्या संदर्भात प्रोत्साहित करण्यात आले. १७२९ विद्यार्थ्यांनी वापर करून शिक्षण घेतले तर २५३ शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या whats app group वर लिंक share विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात टिकून राहानेसाठी प्रयत्न केलेत.

५) भाषा संवर्धन :- एरंडोल तालुक्यात भाषा संवर्धन या विशेष उपक्रमांतर्गत २३ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला तर ५ शिक्षकांनी विद्यार्थ्यांना सहभाग घेणेसंदर्भात प्रोत्साहित केले. मराठी राजभाषा दिनानिमित्त डाएट मार्फत आयोजित केलेल्या अभिव्यक्ती स्पर्धेत एरंडोल तालुक्यातील जि. प. उच्च प्राथमिक शाळा कढोली येथील विद्यार्थी देवेंद्र विनोद बडगुजर हा जळगाव जिल्ह्यात प्रथम क्रमांकाने तर काव्यांजली सतिष रघुवंशी ही जिल्ह्यात तृतीय क्रमांकाने विजयी झाले


६) उर्दू वकृत्व स्पर्धा :

एरंडोल तालुक्यात उर्दू माध्यम तालुकास्तरीय वकृत्व स्पर्धेचे मा. सुचेता पाटील, अधिव्याख्याता तथा संपर्क अधिकारी, जि.शि.व प्र.सं जळगाव यांच्या उपस्थितीत आयोजन करण्यात आले. ८ विद्यार्थी व १५ शिक्षकांनी सहभाग घेतला.



७) बाल दिवस सप्ताह :

इयत्ता १ ली ते १२ वी च्या विद्यार्थ्यांसाठी ८ नोव्हेंबर ते १४ नोव्हेंबर पर्यंत एकूण ९ विषयाकरिता स्पर्धा घेण्यात आली. सदरील स्पर्धेत ३६ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला तालुक्यातील ०७ शाळा उपक्रमात सहभागी झाल्यात.


८) राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (National Education Policy) 2020स्पर्धा :
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (National Education Policy) 2020 वर आधारित शिक्षकांसाठी ऑनलाईन संप्रेषण साहित्य निर्मिती स्पर्धा घेण्यात आली. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेमार्फत आयोजित स्पर्धेत एरंडोल तालुक्यातून जि. प. प्राथमिक शाळा निपाणे येथील तंत्रस्नेही शिक्षक श्री. प्रमोद उत्तम सोनवणे यांनी तयार केलेल्या व्यावसायिक शिक्षणाची पुनर्कल्पना यावर आधारित film ची जिल्ह्यातून उत्कृष्ट साहित्य म्हणून निवड करण्यात आली. सदरील स्पर्धेत तालुक्यातून तीन शिक्षकांनी सहभाग घेतला.



९) नवोपक्रम
एरंडोल तालुक्यातील जि. प. शाळा रिंगणगाव येथे कोरोना कालावधीतील सर्व सावधगिरी बाळगुण वर्ग शिक्षिका श्रीमती पुष्पा पाटील यांनी गटाने साहित्यांच्या महाय्याने संबोध स्पष्टीकरण व स्वयं अध्ययन हा नवोपक्रम राबविला.


१०) विज्ञान प्रश्न मंजुषा:

एरंडोल तालुक्यात विज्ञान प्रश्न मंजुषा online स्पर्धेत २१ विद्यार्थी व ११७ शिक्षकांनी सहभाग
घेतला.

११) करियर पोर्टलवर मार्गदर्शन :

एरंडोल तालुक्यात इयत्ता १० वी च्या विद्यार्थ्यांसाठी करियर पोर्टलवर मार्गदर्शन हा विशेष उपक्रम राबविण्यात आला. या विशेष उपक्रमांतर्गत २२३ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला तर ९९ शिक्षकांनीसहभाग घेतला.

१२) समावेशित शिक्षण उपक्रम : 
अ) जागतिक दिव्यांग सप्ताह:- जिल्हा
शिक्षण व प्रशिक्षण संस्थेमार्फत जागतिक दिव्यांग सप्ताह चे औचित्य साधून दिव्यांग बालकांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. तालुक्यातील २४ दिव्यांग बालकांनी सहभाग घेतला. थॅलेसेमिया ग्रस्त दिव्यांग बालकांची दर महा रक्ताची गरज लक्षात घेऊन श्री. भीमराव रामचंद्र भालेराव विशेष शिक्षक गट साधन केंद्र एरंडोल यांनी रोटरी क्लब जळगाव येथे रक्तदान केले.



ब) शिक्षण आले आपल्या दारी:-
समावेशित शिक्षण उपक्रमांतर्गत एरंडोल तालुक्यातील दिव्यांग बालकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात टिकून राहण्यासाठी समावेशित शिक्षण साधन व्यक्ती, विशेष शिक्षक, दिव्यांग बालकांचे पालक यांचा " शिक्षण आले आपल्या दारी" whats app group तयार करण्यात आला. त्यात २६ दिव्यांग बालकांनी सहभाग घेतला. दिव्यांग बालक व पालकांनी महाराष्ट्र राज्य समावेशित शिक्षण व्यावसायिक संघ मार्फत आयोजित यु ट्यूब व FACEBOOK) LIVE संवाद या विशेष उपक्रमांतर्गत सहभाग घेतला. थॅलेसेमिया दिव्यांग बालकांच्या पालकांसाठी उद्घोधन पर ONLINE कार्यशाळा घेण्यात आली. कु. जान्हवी भरत सूर्यवंशी ह्या दिव्यांग विद्यार्थिनीचा सहभाग .....



क) दिव्यांग बालकांसाठी दिपोत्सव उपक्रम

दिवाळी सणाच्या निमित्ताने दिव्यांग बालकांच्या सुप्त गुणांना वाव मिळण्यासाठी गट साधन केंद्र एरंडोल येथे आकाश कंदील बनविणे व पणती रंगविणे हा उपक्रम घेण्यात आला


ड) दिव्यांग बालकांसाठी अर्सेनिक अल्बम गोळ्या वाटप
एरंडोल तालुक्यात समावेशित शिक्षण उपक्रमांतर्गत १७२ दिव्यांग बालकांना इंडियन रेड क्रॉस सोसायटी अंतर्गत अर्सेनिक अल्बम च्या मा. ग.शि.अ.व्हि. एच. पाटील साहेब यांच्या उपस्थितीत गोळ्या वाटप
करण्यात आल्या.


समावेशित शिक्षण उपक्रमांतर्गत दिव्यांग बालकांना साहित्य वाटप: पंचायत समिती एरंडोल चे मा.सभापती अनिलदादा महाजन व पंचायत समिती सदस्य मा. विवेक दादा पाटील यांच्या हस्ते दिव्यांग बालकांना ०३ तीन चाकी सायकल,०३ सी.पी. चेअर, ०२ व्हिलचेअर, ०५ रोलेटर, ०२ एम. आर. कीट ०७ श्रवण यंत्र ई. साहित्याचे वितरण करण्यात आले.

१३) गोष्टींचा शनिवार :

एरंडोल तालुक्यात ८४ जिल्हा परिषद शाळांमध्ये गोष्टींचा शनिवार हा विशेष उपक्रम कोरोना कालावधीत सर्व नियमांचे पालन करून राबविण्यात आला. जि. प. शाळा कढोली येथील गोष्टींचा शनिवार या उपक्रमांतर्गत कृती कार्यक्रम करताना विद्यार्थ्यांसोबत वर्ग शिक्षिका श्रीमती अलका पाटील.

१४) कोरोना काळातील अभ्यासिका २०२०

एरंडोल तालुक्यात जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थ्यांना वर्ग शिक्षक व शिक्षिकांनी अभ्यासिका तयार केल्यात. विद्यार्थी सदरील अभ्यासिका घरी सोडवून शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात टिकून राहील. जि. प. शाळा खर्ची बु. येथील काही क्षणचित्रे ...


१५) जम्बो सिलिंडर ची कोविड सेंटरला भेट
एरंडोल तालुक्यात जि.प. शिक्षक, साधन व्यक्ती, केंद्र प्रमुख, शि.वि.अ.व ग.शि.अ. यांनी १० जम्बो सिलिंडर ची सामान्य रुग्णालय एरंडोल कोविड सेंटरला म विनय गोसावी प्रांताधिकारी एरंडोल व म अर्चना खेतमाळीस तहसिलदार एरंडोल यांच्या हस्ते भेट देण्यात आली. तसेच माध्यमिक शिक्षक संघटनांकडून एकूण ९२ शिक्षकांनी नव्वद हजार रुपये जमा केले व त्यातून ७ सिलेंडर ग्रामीण रुग्णालयास भेट देण्यात आले.




   २) विशेष उपक्रम : Tele Conferencing
३) Covid साठी शिक्षकांनी केलेली आर्थिक मदत

४) Covid-19 नियंत्रणासाठी शिक्षकांची सहभागिता -
अ) माझे कुटूंब माझी जबाबदारी :
एरंडोल तालुक्यात माझे कुटुंब माझी जबाबदारी या उपक्रमांतर्गत जि.प. ९६ शिक्षकांनी
व ४४ माध्यमिक शिक्षकांनी काम केले.

ब) लसीकरण आरोग्य केंद्रावर लसीकरणासाठी प्राथमिक शाळेचे १३ शिक्षक व
माध्यमिक शाळेचे १० असे एकूण २३ शिक्षक काम करत आहेत.

क) रेशन धान्य दुकान -
एरंडोल तालुक्यात रेशन धान्य दुकानावर ११२ शिक्षकांची नेमणूक केलेली होती..

ड) कॉन्टक्ट ट्रेसिंग :
एरंडोल तालुक्यात कॉन्टक्ट ट्रेसिंग अंतर्गत १२ शिक्षकांनी १२१ दिवस कामकाज केले.
कोविड रुग्णांसाठी कॉल सेंटर सुविधा:
म. जिल्हाधिकारी कार्यालय,जळगाव यांच्यामार्फत कोविड रुग्णांसाठी कॉल सेंटर सुविधा करण्यात
आली. सदरील उपक्रमात गट साधन केंद्र एरंडोल येथील विशेष शिक्षक श्री. भिमराव रामचंद्र भालेराव व श्री दत्तात्रय वंशिलाल पवार यांनी कामकाज केले. मा.भारुडे उपजिल्हाधिकारी जळगाव यांच्या हस्ते उत्कृष्ट कामकाजाबाबत सत्कार करण्यात आला. त्याबाबत खालील क्षणचित्रे..
५) भौतिक सुविधांमध्ये केलेली प्रगती - सन २०२०-२१
अ) संरक्षण भिंत
एरंडोल तालुक्यात ६२ शाळांना संरक्षक भिंत मंजूर असून ५५ शाळांमध्ये संरक्षक भिंत चे कामकाज पूर्ण झालेले आहे.

लोकसहभागातून शाळाखोली बांधकाम

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, खर्ची खुर्द ता. एरंडोल, जि. जळगांव.

आजही काही गावांमध्ये जि प शाळेत विद्यार्थी पटसंख्येच्या तुलनेत विद्यार्थ्यांना बसण्यासाठी वर्ग खोली नाहीत. हीच परिस्थिती खर्ची खुर्द गावात देखील होती. यामुळे विद्यार्थ्यांच्या अध्ययन व अध्यापनावर विपरीत परिणाम व्हायचा. याचे गांभीर्य ओळखून मुख्याध्यापक श्री. राजेन्द्र हिलाल चित्ते यांनी ह. भ. . ज्ञानेश्वर महाराज जळकेकर यांचा शाळा, समाज व शिक्षण या विषयावर खर्ची खुर्द येथे जाहीर व्याख्यान घेतले. या माध्यमातून लोकांकडून देणगी घेणे सोपे झाले. एक वेळ मंदिरासाठी देणगी नाही दिली तरी चालेल, परंतु शाळेसाठी देणगी नक्कीच दिली पाहिजे. कारण शाळा हे गावाचे भविष्य आहे. या पद्धतीने लोकांमध्ये जाणीव जागृती करून दिली. यासाठी गावातून ₹.१०१/- पासून तर ₹.२१,०००/- पर्यंत वैयक्तिक स्वेच्छेने लोंकानी वर्गणी दिली. शाळेचे मुख्याध्यापक श्री. राजेंद्र हिलाल चित्ते यांनी ₹.२१,०००/- देणगी दिली. डॉ. व्ही. एस. मराठे, खर्ची बुद्रुक यांनी खोल्यांचा पाया खोदण्यासाठी JCB तसेच भराव करण्यासाठी डबर व मुरूम, रंग काम यासाठी वस्तू रूपाने देणगी दिली. डॉ. गणेशजी सोमाणी यांनी त्यांच्या वडिलांच्या स्मृती प्रित्यर्थ एका वर्ग खोलीचे पूर्ण बांधकाम करून दिले. पंचक्रोशीतील गावातून देखील देणगी जमा करण्यात आली. रोखीने व वस्तू रूपाने र ४,५०,०००/- जमा करून दीड वर्षात दोन खोल्यांचे काम पूर्णत्वास नेले. आज यामुळे शालेय परिसर शोभून दिसतो. विद्यार्थ्यांना बसण्यासाठी स्वतंत्र वर्ग खोली मिळाली, म्हणून त्यांच्यातही उत्साह संचारला. गुणवत्ता वाढीस पोषक वातावरण तयार झाले. विदयार्थी आनंदाने अध्ययन करतात. " शाळेची शान; हीच खरी गावाची शान " असे उदगार ग्रामस्थांच्या ओठी आहेत.

जि. प. शाळा टाकरखेडे येथे लोकसहभागातून शाळाखोली बांधकाम केले

आमच्या जि प शाळेसाठी न भूतो न भविष्यती असा लोकसहभागातून दोन वर्ग खोल्यांचे बांधकाम झाले. जवळपास लोकसहभागातून 6 लाख रुपये जमा झाले व 14 वा वित्त आयोगातून 4 लाख रुपयातून दोन वर्ग खोल्यांचे दरवाजे, खिडक्या, व रंगरंगोटीचे काम झाले. तसेच जुनी एका खोलीची दुरुस्ती करून रंगरंगोटी करण्यात आली. तसेच 14 वा वित्त आयोगातून जुन्या दोन खोल्यांना संरक्षण जाळी बसविण्यात आली. पेव्हर ब्लॉक बसविण्यात आले.

आमच्या शाळेसाठी अजून एक आनंदाची बाब अशी की रोटरी क्लब वेस्ट जळगांव यांनी आमच्या शाळेची संपूर्ण जळगाव जिल्ह्यातुन हॅप्पी स्कूल म्हणून निवड केलीआहे. त्याअंतर्गत विविध उपक्रम आमच्या शाळेत राबविण्यात येणार आहेत. पहिलाउपक्रम सर्व विद्यार्थ्यांसाठी स्वच्छतागृहाचे बांधकामाची सुरुवात झाली आहे. जवळपास 3 लाख रुपयांचे स्वच्छतागृहाचे बांधकाम आहे. त्यानंतर संपूर्ण खोल्यांना इलर्निंग साहित्य, मुलांना खेळण्यासाठी विविध खेळाचे साहित्य, सर्व वर्ग खोल्यांचे चित्रमय सजावट, शालेय बाग, सर्व विद्यार्थ्यांना वह्या, कपडे, बूट मोजे यांचे वाटप करण्याचे नियोजन आहे.


ब) डीजिटल क्लासरुम



2 comments:

  1. बढीया..... सर्व उपक्रमांची नोंद खूप व्यवस्थित घेतलीय.

    ReplyDelete
  2. Very Very Nice Sir ji.......Thanks

    ReplyDelete