Thursday, 18 June 2020

अभ्यासमाला-३१

अभ्यासमाला-३१

दि. १४ मे २०२०  वार- गुरूवार

शाळा बंद..पण शिक्षण आहे (अभ्यासमाला-३१)

नमस्कार विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो!
     घरीच राहून आपण सर्वांची काळजी घेताय ना? कोव्हिड-१९ या साथीच्या काळात आपण सर्वजण घरी सुरक्षित राहून कोरोना विषाणूला पळवून लावू याची मला खात्री आहे.
    महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री मा.ना.वर्षा गायकवाड यांच्या प्रेरणेने  राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे मार्फत आपण सुरू केली आहे विविध शैक्षणिक व सहशालेय उपक्रमांची मालिका! यातील उपक्रम १ ली ते १० वीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांनी कृती करून पहावेत आणि आनंद घ्यावा . 
     त्याचबरोबर इयत्ता 5 वी व 8 वी शिष्यवृत्ती, 10 वी अभ्यासमाला आणि अवांतर वाचनासाठी एक पी.डी.एफ. पुस्तकही दररोज पुरवण्यात येत आहे.
     सध्या लॉकडाऊन (बंद)च्या काळात आपला अभ्यास थांबू नये यासाठी आम्ही  दररोज आपल्यासाठी घेऊन येत आहोत ऑनलाईन अभ्यास व विविध उपक्रम! त्यासाठी आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये दीक्षा ऍप डाऊनलोड करावे लागेल. त्यासाठी खालील लिंकला टच करा.


Storyweaver
हे माझे घर


अवांतर वाचन
आजच्या पुस्तकाचे नाव : बबलीचं ढोलक


कला/हस्तकला
भाज्यांचे बनवले ठसे - भाग २


स्पोकन इंग्लिश
Reading words with VCV technique


संगणक विज्ञान
ध्वनी प्रक्षेपित करणे


संगीत/नाटक
गायन - वादन
दादरा तालावर आधारित गीत


मजेत शिकूया विज्ञान
जादूचा कॅलिडोस्कोप


इयत्ता १०वी अभ्यासमाला
विषय - विज्ञान व तंत्रज्ञान भाग - १
पाठ - उष्णता - विशिष्ट उष्माधारकता


शिष्यवृत्ती परीक्षा तयारी
इयत्ता - ५ वी
विषय - बुद्धिमत्ता चाचणी
घटक - मालिका - संख्यामालिका भाग २


इयत्ता - ८ वी
विषय - English
घटक - SMS Language


Stay home, stay safe!

आपला
दिनकर पाटील,
संचालक
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे

No comments:

Post a Comment